शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
2
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
3
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
4
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
5
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
7
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
8
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
9
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
10
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
11
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
12
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
13
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
14
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
15
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
16
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
17
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
18
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
19
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
20
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !

धडगाव उपविभागातील 3 हजार ग्राहकांची वीज कापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:32 PM

लोकमत न्यूज नेटवर्क धडगाव : थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी कठोर पावले उचलत विज वितरण कंपनीच्या शहादा विभागातील धडगाव उपविभागात 3 ...

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : थकीत वीजबिलांच्या वसुलीसाठी कठोर पावले उचलत विज वितरण कंपनीच्या शहादा विभागातील धडगाव उपविभागात 3 हजार ग्राहकांचे वीज कनेक्शन कापण्यात आले आह़े यामुळे धडगाव शहरासह दुर्गम भागातील अनेक घरे गेल्या आठ दिवसांपासून अंधारात आहेत़      धडगाव उपविभागातील घरगुती आणि व्यावसायिक वीज बिलांची वसुली गत सहा महिन्यांपासून झालेली नसल्याची माहिती आह़े कंपनीकडून थकबाकीदार ग्राहकांना वारंवार सूचना करुनही त्यांच्याकडून वीज बिलांचा भरणा होत नसल्याने अखेर गेल्या आठवडय़ापासून वीज कनेक्शन कापण्याची कारवाई सुरु करण्यात आली होती़ यांतर्गत आतार्पयत 3 हजार 400 ग्राहकांची वीज कापली गेली आह़े यामुळे धडगाव शहर आणि परिसरातील गावांमध्ये गत आठ दिवसांपासून अंधार आह़े या प्रकारानंतरही बोटावर मोजण्याएवढय़ाच ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा केला आह़े येत्या काळात ही मोहिम आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत वीज कंपनीकडून देण्यात आले आहेत़ या प्रकाराने थकबाकीदार ग्राहकांची भंबेरी उडाली असून वीज पूर्ववत करण्यासाठी त्यांच्याकडून बिलांचा भरणा सुरु झाल्याची माहिती आह़े वीज कंपनीच्या शहादा विभागाकडून सध्या  बिल नाही तर वीज नाही ही मोहिम सुरु करण्यात आली आह़े यांतर्गत शहादा, तळोदा, धडगाव  आणि  अक्कलकुवा याठिकाणी थकबाकीदार ग्राहकांना ताकीद देऊन बिल भरण्याबाबत सांगण्यात येत आह़े यानंतरही बिल भरणा:या ग्राहकांची वीज कापली जात आह़े  यांतर्गत  धडगाव उपविभागात 3 हजार 400 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला़ वीज कंपनीचे दिलीप पावरा, समाधान मानकर, सोमनाथ लोहार यांच्याकडून ही कारवाई करण्यात येत आह़े शहादा विभागाचे कार्यकारी अभियंता किसन पावरा हे गत आठ दिवसांपासून धडगावात तळ ठोकून आहेत़ त्यांच्याकडून ग्राहकांना वीज बिल भरण्याबाबत समज दिली जात आह़े 

धडगाव उपविभागात एकूण 18 हजार  वीज ग्राहक आहेत़ तालुक्यात 59 लाख रुपयांची विद्युत बिले थकीत आहेत़  थकबाकीच्या वसुलीसाठी वीज कंपनीच्या कर्मचा:यांची सातत्याने फिरफिर होत आह़े नियमित वीज ग्राहकांना सुविधा देण्यात अडचणी येत आहेत़ यामुळे वीज यंत्रणेची देखभाल दुरूस्ती करणे, नव्या वीज जोडण्या, ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे शक्य होत नसल्याचे प्रकार होत आहेत़दरम्यान धडगाव येथील उपकार्यकारी अभियंता  जगदिश पावरा यांनी आकडे टाकुन  विज चोरी करणा:या ग्राहकांवर कारवाई करुन घरोघरी मीटर तपासणी होणार असल्याचे सांगितले आह़े यात दोषी आढणा:यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे त्यांनी कळवले आह़े विज बिलांच्या संदर्भातील वसुली आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी धडगाव शहरात चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती आह़े 

सध्या ज्या ग्राहकांची वीज कंपनीने खंडीत केली आह़े त्यांची आकस्मिकपणे फेरतपासणीही होणार आह़े यादरम्यान एखादा ग्राहक वीज चोरीत दोषी आढळल्यास किंवा शेजारील घरातून अनधिकृतपणे वीज घेत असल्यास त्याच्यावर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याचा इशारा वीज कंपनीच्या अधिका:यांकडून देण्यात आला आह़े तालुक्यातील अनेक गावांचा थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडीत झाल्याची वेळ प्रथमच येऊन ठेपल्याचे दिसून आले आह़े