भराडीपादरच्या घाटपाडा येथे 30 कुटूंबे संपर्काबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 12:10 IST2019-08-13T12:10:09+5:302019-08-13T12:10:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : तालुक्यातील भरडीपादरच्या घाटपाडा येथे देहली नदीच्या पुरामुळे 30 कुटूंबे मदतीविना गावात अडकून पडली आहेत़ ...

भराडीपादरच्या घाटपाडा येथे 30 कुटूंबे संपर्काबाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : तालुक्यातील भरडीपादरच्या घाटपाडा येथे देहली नदीच्या पुरामुळे 30 कुटूंबे मदतीविना गावात अडकून पडली आहेत़ पुरामुळे त्यांना बाहेर पडणे शक्य नसल्याने त्यांचे हाल होत असून प्रशासनाने त्यांना मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत़
घाटपाडा येथे जाण्यासाठी देहली नदी व सिकलनदीवरुन रस्ता आह़े पुरामुळे हे दोन्ही रस्ते बंद असल्याने याठिकाणी तेथून कोणीही बाहेर पडू शकलेले नाही़ शनिवारी येथील नागरिकांनी संपर्क केल्यानंतर हा प्रकार समोर आला़ रविवारी रात्री उशिरा येथे तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी भेट दिली होती़ सोमवारी नदीत मानवी साखळी करुन जीवनावश्यक वस्तू पोहोवण्यात आल्या आहेत़