शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

‘मानव विकास’च्या कामांचे १४ कोटींचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मानव विकास कार्यक्रमातंर्गत मिळणारा निधी विकासाला चालना देणारा आहे. या निधीअंतर्गत येणारी सर्व कामे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मानव विकास कार्यक्रमातंर्गत मिळणारा निधी विकासाला चालना देणारा आहे. या निधीअंतर्गत येणारी सर्व कामे त्वरीत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रंगावली सभागृहात जिल्हा मानव विकास कार्यक्रम जिल्हास्तरीय कार्यबल समिती आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील, मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त किरण पाडवी, सहाय्यक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी धुळे विजय सोनार, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी यतीन सोनार आदी उपस्थित होते.डॉ. भारुड म्हणाले, नियोजन विभागाकडून महाराष्ट्र विकास मंडळांना सन २०१९-२० मध्ये विशेष निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या निधीतून मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट तालुक्यात मानव विकास निर्देशांक वाढविण्याच्या दृष्टीने योजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी १४ कोटी ६७ लाख रक्कमेचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यानुसार उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळातर्फे रुपये सात कोटी ४० लाख रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.मान्यता दिलेल्या प्रकल्पांमध्ये सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय विभागामार्फत अक्कलकुवा, धडगांव, नवापूर, नंदुरबार व शहादा तालुक्यात फिश प्रोसेसिंग प्लॉट तयार करणे, यशवंत तलावात तरंगते पिंजरे उभारणी करणे, मच्छिमार संस्थांना शितपेटीयुक्त दुचाकी वाहन उपलब्ध करुन देणे, मत्स्यबीज निर्मितीसाठी वतुर्ळाकार हॅचरी निर्मिती करणे. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत नंदुरबार, शहादा व तळोदा तालुक्यात महिला बचत गटांमार्फत कृषी अवजारे बँक स्थापन करणे, महिला बचत गटांकडून कापडी पिशव्या शिवून घेण्यासाठी यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, महिला बचत गटांना शेळी गट वाटप करणे, महिलांसाठी हात मागावर कापड तयार करण्यासाठी प्रशिक्षण व यंत्र सामुग्रीसाठी अर्थसहाय्य देणे, महिला बचत गटांना केळी चिप्स तयार करुन विकणे. प्रकल्प संचालक आत्मा यांच्यामार्फत नवापूर, तळोदा, नंदुरबार व शहादा तालुक्यात शेतकरी बचत गटांना मिनी राईस मिल व मका सोलणी यंत्र वितरीत करणे. तसेच नगरपालिकेमार्फत तळोदा व नवापूर तालुक्यात नगरपरिषदेसाठी दोन शववाहिनी खरेदी करणे या योजनांचा समावेश आहे, अशी माहिती सोनार यांनी यावेळी दिली.बाळंत महिलांना बुडीत मजुरीअंतर्गत जिल्ह्यासाठी चार कोटी २३ लाख रुपये कोटी रुपये एवढा निधी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. सन २०१८-१९ मध्ये जिल्ह्यासाठी ७० लक्ष निधी उपलब्ध होता आणि सन २०१९-२० या आर्थिक वर्षात एकूण १५ कोटी एवढा निधी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.मानव विकास कार्यक्रममध्ये विशेष निधी अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण/उपजिल्हा रुग्णालय यांच्यासाठी अद्ययावत साहित्य खरेदीसाठी दोन कोटी मंजूर करण्यात आले आहे. कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यात स्थानिकांना रोजगार निर्मितीसाठी आठ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.