शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या बोनेटमध्ये लपविलेला २८ हजाराचा मद्यसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 11:39 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातून गुजरातमध्ये अवैध दारू घेऊन जाणारऱ्या एकास एलसीबीने अटक केली. त्याच्याकडून तीन लाख २८ ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातून गुजरातमध्ये अवैध दारू घेऊन जाणारऱ्या एकास एलसीबीने अटक केली. त्याच्याकडून तीन लाख २८ हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अलिशान कारच्या बोनेटमध्ये, दरवाजाच्या कव्हरमध्ये तब्बल १९० दारुच्या बाटल्या लपविलेल्या आढळून आल्या. पोलिसांनी कारसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून एकाला अटक केली आहे. घन:शामभाई खमजीभाई खेनी, रा.सुरत असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, तळोदाहून नळवामार्गे नंदुरबारात अवैध दारू घेऊन कार येतत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली होती.  त्यानुसार त्यांनी पथकाला या भागात पाळत ठेवण्याचे सांगितले. दुपारी एक वाजेच्या सुमारास नळवा गावाकडून नंदुरबारात येत असलेल्या कार चालकाला अडविले.  पोलिसांना पहाताच त्याचे हावभाव ओळखून पोलिसांनी कारची झडती घेतली. परंतु कारमध्ये काहीच आढळले नाही. परंतु खेनी याची हालचाल संशयास्पद वाटल्याने आणि खबर पक्की असल्याची खात्री असल्याने पुन्हा पोलिसांनी कारची बारकाईने तपासणी केली असता दरवाजाच्या कव्हरमध्ये त्यांना दारूच्या बाटल्या आढळल्या. शिवाय बोनेटमध्ये देखील कप्पा करून त्यात बाटल्या ठेवलेल्या दिसल्या. एकुण १९० बाटल्या कारमधून काढण्यात आल्या. त्यांची किंमत २८ हजार रुपये इतकी आहे. पोलिसांनी कारसह एकुण तीन लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.      याबाबत घन:शामभाई खमजीभाई सेनी, रा.सुरत यांच्याविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक विजयसिंग राजपूत, हवालदार मुकेश तावडे, मनोज नाईक, जितेंद्र ठाकुर यांच्या पथकाने केली.