शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

मिशन हरीत सातपुडासाठी २५ लाख रोपे झाली तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा १ जुलैपासून मिशन हरीत सातपुडा सुरु होणार आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून अंमलबजावणी होणाºया ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा १ जुलैपासून मिशन हरीत सातपुडा सुरु होणार आहे़ जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून अंमलबजावणी होणाºया या योजनेत वनविभागाकडून मोलाचे कामकाज होत असून सुमारे २५ लाख रोपांची लागवड होणार आहे़ आजअखेरीस जिल्ह्यात शहादा आणि मेवासी वनविभागाने १९ लाख खड्डे खोदून तयारी पूर्ण केली आहे़चार कोटी वृक्ष लागवड योजनेत राज्यातून पहिल्या दहा जिल्ह्यात स्थान मिळवणाºया नंदुरबार जिल्ह्यात यंदा कोट्यावधी झाडे लागवड करण्यापेक्षा गेल्या वर्षात लागवड केलेल्या झाडांचे योग्य ते संगोपन करुन मर आलेली झाडे पुन्हा सुस्थितीत आणण्याचे काम केले जाणार आहे़ यांतर्गत सातपुडा हरीत करण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला होता़ यांतर्गत वनविभागाने आजअखेरीस १९ लाख झाडांची निर्मिती पूर्ण केली आहे़ शहादा आणि तळोदा मेवासी वनविभागाच्या ३६ च्या जवळपास असलेल्या रोपवाटिकांमध्ये ही झाडे गेल्या जानेवारी महिन्यापासून तयार करण्याचे काम सुरु होते़ यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचाही समावेश करण्यात आला असून यांतर्गत सुमारे १ लाख झाडांची लागवड करुन त्यांचे रोपण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे़ यासाठी रोपवाटिकांमध्ये मजूरांना पाचारण करुन कामकाज करण्यावर वनविभागाने भर दिला होता़ सोबत जागोजागी सीसीटी समतल चर तयार करण्यात आले असून यातही वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ वनविभाग, सामाजिक वनीकरण आणि जिल्ह्यातील ५८६ ग्रामपंचायती यांच्यामार्फत विविध योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्था, शाळा आणि सामान्य नागरिक यांनाही वनविभागाकडून वृक्षांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़जिल्ह्यात मिशन हरीत सातपुडा या योजनेंतर्गत १९ लाख रोपे तयार आहेत़ त्यासाठी १९ लाख खड्डे रोहयोच्या माध्यमातून खोदले गेले आहेत़ यात नंदुरबार-शहादा वनविभागाने साडेसहा लाख रोपे लागवड करण्याचे नियोजन केले आहे़ मेवासी वनविभाग तळोदा यांनी ३ लाख १५ हजार तर सामाजिक वनीकरण व ग्रामपंचायतींना सात लाख रोपांच्या लागवडीचे उद्दीष्ट्य देण्यात आले आहे़४रोहयोंतर्गत १ लाख रोपांची लागवड करण्याचा निर्णयही वनविभागाने घेतला आहे़ नंदुरबार विभागांतर्गत नवापूर शहर, चिंचपाडा, देवमोगरा ता़ नवापूर, ठाणेपाडा ता़ नंदुरबार याठिकाणी वनविभागाने रोपे तयार केली आहेत़ वनविभागाने तयार केलेल्या सीसीटीच्या कामात सात लाखांपेक्षा अधिक रोपे उगणवणार आहेत़ याठिकाणी बिया रोवण्याचे काम सध्या मजूरांकडून सुरु आहे़जिल्ह्यात वनविभागाच्या मार्गदर्शनात २०१९ या वर्षात वृक्ष लागवड योजनेंतर्गत ९१ लाख ४४ हजार झाडांची लागवड झाली होती़ यातील नंदुरबार वनविभागांतर्गत लागवड केलेली २६ लाख झाडे ही सुस्थितीत आहेत़ विभागाने ३१ झाडांची लागवड केली होती़ उर्वरित पाच मर आलेली झाडे यंदा काढून त्याठिकाणी पु्न्हा नव्याने रोप लागवड होणार आहेत़२०१८ या वर्षात जिल्ह्यात ४८ लाख ५० हजार झाडांची लागवड केली होती़ यातील ८० टक्के झाडे जगल्याचा अहवाल वनविभागाने दिला आहे़२०१७ या वर्षात जिल्ह्यात १६ लाख ५० हजार झाडे रोवण्यात आली़ या झाडांची स्थिती चांगली असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे़यंदा जून महिन्यात पाऊस झाल्याने वनविभागाने रोपांची लागवड सुरु केली असल्याची माहिती देण्यात आली आहे़