स्वयंरोजगारासाठी १२ हजार जणांना देणार २४ हजार देशी गायी - विजयकुमार गावित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 18:01 IST2023-04-03T17:59:47+5:302023-04-03T18:01:48+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य, महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष, सचिव यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

स्वयंरोजगारासाठी १२ हजार जणांना देणार २४ हजार देशी गायी - विजयकुमार गावित
रमाकांत पाटील
नंदुरबार : जिल्ह्यातील १२ हजार जणांना २४ हजार देशी गायींचे वितरण करण्यात येणार आहे. त्यांच्यापासून दुधासह इतर पूरक उत्पादन घेण्यासाठी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने महिला शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य, महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष, सचिव यांच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री डाॅ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील, अनिल शिंदे, विकास दांगट, किरण पटवर्धन, परेश सेठ, गटविकास अधिकारी जयवंत उगले उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. गावित यांनी, बचत गटांना सक्षम करून त्यांना मदत केली पाहिजे असे सांगून, व्यवसाय निवडताना त्यांचे मार्केटिंग महत्त्वाचे आहे. मार्केटिंग होत नसल्याने आपण यशस्वी होत नाही. येत्या वर्षात गावातील प्रत्येक मुला-मुलीच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्ह्यातील १२ हजार लाभार्थींना प्रत्येकी दोन याप्रमाणे २४ हजार देशी गायीचे वितरण लवकरच करणार असून, या गायीच्या गोमूत्र व शेणालाही मागणी आहे. त्यांचा व्यवसाय आपणास करता येणार आहे. ज्या वस्तूला बाजारात मागणी आहे व पुरवठा कमी होतो अशा वस्तूंची माहिती घेऊन त्यांचा व्यवसाय केला पाहिजे, असेही सांगितले.