शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी २३ कोटींचा निधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2017 3:54 PM

अश्वसंग्रहालयाचे भूमिपूजनाप्रसंगी नंदुरबार जिल्हा पर्यटनासाठी ‘आकर्षक’ बनवविण्याचा केला संकल्प

ठळक मुद्देमुख्यमंत्री उवाच...महाभारतकालात सारंंगखेडा अश्वमहोत्सवाच्या पाऊलखुणाछत्रपती शिवाजी महाराज यांची घोडी, महाराणा प्रताप यांचा चेतक हे शौर्याचे प्रतिकसारंगखेडा येथील अश्व संग्राहालय ठरणार जगाचे आकर्षणतोरणमाळ येथे पर्यटन संकुल, तापी रिव्हरफ्रंट वॉटर स्पोर्टस आणि प्रकाशा येथील संगमेश्वर मंदिराचा विकास करणार

नंदुरबार : सारंगखेड्यात चेतक फेस्टीवलसोबतच वॉटर स्पोर्टस पर्यटन विभागामार्फत सुरू करण्यात येणार आहे़ येथे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटसाठी पाच कोटी रूपयांचा निधी देत आहे़ आदिवासी संस्कृती पर्यटन विभागाच्या माध्यमातून लोकांपुढे न्यायची आहे़ यासाठी जिल्ह्याला अधिक आकर्षक तयार करून पर्यटकांपुढे नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले़ यावेळी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळावी यासाठी २३ कोटींच्या निधीची घोषणा त्यांनी केली. सारंगखेडा ता़ शहादा येथील अश्वसंग्रहालयाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते़.यावेळी राज्याचे पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ़ हीना गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, प्रधान सचिव नितीन गद्रे, विभागीय आयुक्त महेश झगडे, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, चेतक फेस्टीवलचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, विक्रांत रावल, आशुतोष राठोड, उद्योजिका रेखा चौधरी, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़प्रसंगी मुख्यमंत्री देंंवेद्र फडणवीस यांनी सांगितले की, सारंगखेडा येथील चेतक फेस्टीवलमध्ये लावलेल्या चित्रप्रदर्शनात संशोधकांनी ३०० वर्षांपूर्वी हा अश्वमहोत्सव होत असल्याचे नमूद केले आहे़ परंतू खरे पाहता महाभारतकालात सारंंगखेडा अश्वमहोत्सवाच्या पाऊलखुणा सापडत आहेत़ घोडा किंवा अश्व हा मानवासाठी एक आकर्षण राहिला आहे़ छत्रपती शिवाजी महाराज यांची घोडी, महाराणा प्रताप यांचा चेतक हे शौर्याचे प्रतिक आहेत़ अशा या ऐतिहासिक प्राण्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे़ सारंगखेडा यात्रोत्सवाच्या माध्यमातून ही संकल्पना पूर्ण होत आहे़

सारंगखेडा येथे निर्माण होणारे अश्व संग्राहालय हे जगाचे आकर्षण बनणार आहे़ याठिकाणी आमदार डॉ़ विजयकुमार यांनी केलेल्या घोड्यांचे प्रजनन केंद्र आणि दवाखाना यांचाही विचार केला जाणार आहे़ प्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अश्वसंग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात आले़ यानंतर चेतक फेस्टीवलअंतर्गत घोड्यांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या़ मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह जयकुमार रावल, आमदार डॉ़ गावीत व खासदार डॉ़ हीना गावीत यांनी अश्व बाजारात फेरफटका मारून माहिती जाणून घेतली़

पर्यटनासाठी २३ कोटींची तरतूदसारंगखेडा येथील भाषणादरम्यान मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी २३ कोटी रूपये देण्याची घोषणा केली़ या रकमेतून पर्यटन विभागामार्फत तोरणमाळ येथे पर्यटन संकुल, तापी रिव्हरफ्रंट वॉटर स्पोर्टस आणि प्रकाशा येथील संगमेश्वर मंदिराचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली़ यावेळी त्यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या कामाचे कौतुक करत त्यांच्या योजना ह्या दूरदृष्टीच्या असल्याचे सांगितले़

टॅग्स :Devendra Fadnvisदेवेंद्र फडणवीस