शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? देशवासीयांना केलं मोठं आवाहन
2
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
3
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
4
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
5
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
6
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
7
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
8
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
9
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
10
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
11
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
12
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
13
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
14
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
15
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
16
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
17
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
18
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
19
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
20
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनच्या काळात २० हजार एचआयव्ही टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथकाने जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून ...


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण पथकाने जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून २० हजार जणांच्या एचआयव्ही टेस्ट केल्या होत्या़ यातील ५४ जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत़ त्यांच्यावर उपचार सुरू असून १० हजार गर्भवती मातांची नियमित चाचणी लॉकडाऊन काळात करण्यात आली होती़
लॉकडाऊन काळात कोविड कक्षांना प्राधान्य देत असतानाच इतर आरोग्य सेवांनाही नियमित सुरू ठेवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते़ त्यानुसार विविध विभागांचे कामकाज सुरू होते़ यात सर्वाधिक महत्त्वपूर्ण असलेल्या एचआयव्ही तपासण्या जिल्ह्यात नियमित सुरू ठेवण्यात आल्या होत्या़ यात गर्भवती मातांना प्रथम प्राधान्य देण्यात आल्याने १० हजार मातांची तपासणी करुन त्यांना अहवाल पोहोचवले गेले होते़ लॉकडाऊन काळात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक यांच्याकडून एचआयव्ही टेस्ट होत असतानाच नियमित एचआयव्हीबाधित रुग्णांना घरपोच औषधी आणि किराणा पोहोचते करण्याचे कामही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून करण्यात आले आहे़ यातून आजारी असलेल्यांना मोठा आधार मिळाला असून अद्यापही दर महिन्याला लागणाऱ्या गोळ्या घरपोच करण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़
रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या एचआयव्ही बाधितांना कोरोनाचा खरा धोका असल्याने पथक आणि सामाजिक संस्था यांच्याकडून बाधितांसोबत सातत्याने संपर्क करुन त्यांना माहिती देण्यात येत होती़ यामुळे आजअखेरीस एकाही एचआयव्हीबाधिताला कोरोना संसर्ग झालेला नसल्याची माहिती समोर आली आहे़ लॉकडाऊनदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ रघुनाथ भोये व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ के़डी़सातपुते यांच्या मार्गदर्शनात जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलिक, जिल्हा पर्यवेक्षक विश्वास सूर्यवंशी, सामाजिक संस्थेचे रवि गोसावी, आशा माळी यांनी लॉकडाऊन काळात एचआयव्हीबाधितांसाठी विशेष अभियान राबवले होते़ यांतर्गत देहविक्री करणाºया ३० महिला, ४८ समलिंगी संबध ठेवणारे पुरूष, ४५६ एचआयव्हीबाधितांना एआरटी औषधोपचार कीट घरपोच पुरवण्यात आले होते़ दरम्यान २२० मुलांना न्यूट्रीशन कीटचेही वाटप करण्यात आले होते़ परगावी तसेच बाहेर राज्यात अडकलेल्या रुग्णांनादेखील जिल्हा रुग्णालयाच्यामार्फत तात्पुरत्या स्वरूपात एआरटी उपचार मिळवून देण्यात आले आहेत़ देहविक्री करणारे महिला आणि पुरूष अशा २०० लोकांना लॉकडाऊन काळात किराणा तसेच अन्नधान्य देण्यात आले़ १ एप्रिल ते ३० जून या काळात १० हजार ४३६ गरोदर मातांच्या एचआयव्ही टेस्ट करण्यात आल्या होत्या़ यातील तीन माता ह्या एचआयव्ही बाधित असल्याचे समोर आले होते़ त्यांना उपचार देण्यात येत आहेत़ दरम्यान १० हजार ५७० जणांनी एचआयव्ही टेस्ट करुन घेतली होती़ यातील ५१ जण हे एचआयव्ही बाधित आहेत़ यातील ५० जणांना गोळ्या व औषधी पुरवठा सुरू करण्यात आला आहे़ जुलै महिन्यातही एचआयव्हीच्या नियमित चाचण्या सुरूच होत्या़ गर्भवती मातांच्याही नियमित टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे़ निराधार असलेल्या ३४ एचआयव्हीबाधितांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला आहे़
जिल्ह्यात एचआयव्ही बाधितांना लॉकडाऊन काळात नैराश्य घेरु नये यासाठी समुपदेशक सातत्याने ंच्यासोबत संपर्क करुन माहिती देत होते़
सामाजिक संस्थांच्या मदतीने एचआयव्हीबाधितांसाठी तीन महिने राबवलेले उपक्रम यशस्वी झाले आहेत़ घरपोच औषधी, न्यूट्रीशन कीट तसेच तपासण्या सुरू आहेत़ कोरोना योद्धे म्हणून काम करताना कर्मचारी एचआयव्हीबाधितांसाठी काम करुन मेहनत घेत आहेत़
-नितीन मंडलिक, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, एड्स नियंत्रण पथक़