जिल्ह्यासाठी लवकरच मिळणार २० रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 12:49 PM2020-07-13T12:49:43+5:302020-07-13T12:49:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी लवकरच २० रुग्णवाहिका उपलब्ध देऊ आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी १३० कोटी ...

20 ambulances will be available for the district soon | जिल्ह्यासाठी लवकरच मिळणार २० रुग्णवाहिका

जिल्ह्यासाठी लवकरच मिळणार २० रुग्णवाहिका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी लवकरच २० रुग्णवाहिका उपलब्ध देऊ आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी १३० कोटी रुपयांचा निधीदेखील शासनाकडून लवकर मिळवणार असल्याची माहिती पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी दिली. राणीपूर ता़ शहादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़
जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ.हीना गावीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, आरोग्य सभापती जयश्री पाटील, बांधकाम सभापती अभिजित पाटील, शहादा पंचायत समिती सभापती बायजबाई भिल, सभापती रतन पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, माजी मंत्री अ‍ॅड़ पद्माकर वळवी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एऩडी़ बोडके आदी उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करण्यात आले़ यानंतर त्यांनी आरोग्य केंद्रात जावून माहिती घेतली़ यावेळी त्यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण करण्यात आले़
पालकमंत्री पाडवी यांनी सांगितले की, आरोग्य केंद्रांमुळे दुर्गम भागातील जनतेला सुविधा उपलब्ध होतील. केंद्राचा ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रयत्न राहिल़ येथे आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध केली जाईल, आरोग्य, शिक्षण आणि पाण्याची समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येत असून जिल्ह्याच्या दुर्गम भागाचा विकास करण्यासाठी अंदाजपत्रकातही तरतूद करण्यात आली आहे़
जि़प अध्यक्षा सीमा वळवी आरोग्य केंद्रासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणि मनुष्यबळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच एक महिन्याच्या आत साधन सामुग्री आणि रुग्णवाहिका उपलब्ध होतील अशी माहिती दिली़
खासदार डॉ़ गावीत यांनी केंद्रामुळे तोरणमाळ येथे येणाऱ्या पर्यटकांना संकटावेळी मदत मिळू शकेल़ जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आरोग्य केंद्राची उभारणी होत असल्याने आरोग्य सेवा अधिक बळकट होईल़ तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य सुविधा सक्षम करण्याचा प्रयत्न आहे़

Web Title: 20 ambulances will be available for the district soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.