शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदी काळात १८ हजार पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:50 IST

नंदुरबार : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि वाढता मृत्यूदर यामुळे प्रशासनाने १ एप्रिल पासून १५ दिवसांचा लाॅकडाऊन ...

नंदुरबार : जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या आणि वाढता मृत्यूदर यामुळे प्रशासनाने १ एप्रिल पासून १५ दिवसांचा लाॅकडाऊन घोषित केला होता. या १५ दिवसांच्या कार्यकाळातच जिल्ह्यात १२ हजार २५१ नवीन कोरोनाबाधित समोर आले होते. दरम्यान १ एप्रिल ते एक मे या काळात जिल्ह्यात १७ हजार ७६८ नवीन बाधित रुग्ण समोर आले होते.

कमी अधिक प्रमाणात आढळणारे कोरोना रुग्ण आणि दिवसाला किमान एक असा मृत्यूदर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात फेब्रुवारी अखेरीपासून कोरोनाचा विस्फोट होण्यास सुरुवात झाली. मार्चच्या पहिल्या आठवड्यात दिवसाला ५०० रुग्ण समोर येणे सुरु झाले. ही संख्या वाढत जाऊन आठवडाभरात दिवसाला १ हजारापर्यंत पोहोचली होती. यातून नंदुरबार जिल्हा प्रशासनाने सर्व उपाययोजना करुनही रुग्ण संख्या घटत नसल्याने अखेर एक एप्रिलपासून १५ एप्रिलपर्यंत संपूर्ण लाॅकडाऊन घोषित केला होता. यानंतरही जिल्ह्यातील बाधितांची संख्या ही वाढती राहून २५ हजाराच्या पार गेली होती. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ६११ जणांचा काेरोनामुळे मृत्यू झाला आहे. यातून जिल्ह्याचा मृत्यूदर हा १. ८ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात ३१ मार्चपर्यंत २९६ जणांचा मृत्यू झाला होता. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ अशी ही संख्या होती. परंतु ३१ मार्च ते १ मे या कालावधीत या एक महिन्यात जिल्ह्यात एकूण ३१५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूदर तोच असला तरी त्याचा स्पीड रेट हा वाढला असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

ग्रामीण भागात रुग्ण वाढल्याने वाढली प्रशासनाची चिंता, उपाययोजनांना गती

जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात उसळल्याचे दिसून आले. जिल्ह्यात एकूण ५८६ ग्रामपंचायती आहेत. यापैकी ३५९ ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात नंदुरबार तालुक्यात ४५, नवापूर ७६, शहादा १२५, तळोदा ६७, अक्कलकुवा २९ तर धडगाव तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या हद्दीत कोरोना रुग्ण होते.

जिल्ह्यात तालुकानिहाय रुग्णसंख्येत नंदुरबार तालुक्यात १४ हजार १०७, शहादा ११ हजार १००, तळोदा ३ हजार ३७०, नवापूर ३ हजार ३९८, अक्कलकुवा ८०५ तर धडगाव तालुक्यात ७१० रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ३३ हजार रूग्णांपैकी २५ हजार नागरिक कोरोनामुक्त झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

संचारबंदी काळातही कोरोनाबाधित वाढीस लागत असल्याचे प्रमुख कारण नागरिकांचा संपर्क कमी न होणे हेच असल्याचे सांगण्यात आले. यातून टेस्ट वाढल्याने रुग्ण समोर येत होते. ग्रामीण भागात मास्कचा वापर कमी असल्याचे दिसून येत होते. यातून प्रशासनाने लसीकरण व जनजागृतीचा वापर वाढवल्याने एप्रिलच्या अंतिम आठवड्यात रुग्णसंख्येला काही अंशी ब्रेक लागल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

या कारणांमुळे वाढली अन् घटली रुग्णसंख्या

जिल्ह्यात संचारबंदी लागू असतानाही रुग्णसंख्या घटत नव्हती. उपचार मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ होत होती. यातून वाढलेले बेड, उपचारांसाठी रेमडेसिविरचे रेशनिंग, पुरेसा ऑक्सिजन यातून उपचार घेणाऱ्यांना दिलासा मिळाला.

जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमुख कारण जिल्ह्यात बाहेरगावाहून येणारे प्रवासी असल्याचा दावा होत होता. प्रामुख्याने मध्यप्रदेशातून येणारे तसेच मोठ्या शहरातून येणाऱ्यांमुळे कोरोनाचा संसर्ग होत होता.

लाॅकडाऊन आणि जिल्हाबंदी यामुळे कोरोनाच्या रुग्णांवर बऱ्यापैकी नियंत्रण आले आहे. प्रशासनाने आरटीपीसीआर व रॅपिड अशा दोन्ही चाचण्या वाढवल्या असल्याने रुग्ण समोर येऊन त्यांच्यावर उपचार करणे सोपे झाल्याची माहिती दिली गेली आहे.