शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

आकांक्षित जिल्हाअंतर्गत 150 अंगणवाडी स्मार्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 14:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आकांक्षीत जिल्हाअंर्गत विविध उपक्रम राबविले जात असून जिल्ह्यातील 150 अंगणवाडी या स्मार्ट करण्यात येणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आकांक्षीत जिल्हाअंर्गत विविध उपक्रम राबविले जात असून जिल्ह्यातील 150 अंगणवाडी या स्मार्ट करण्यात येणार आहेत. त्यासाठी विविध संस्थाचे सहकार्य घेतले जाणार असल्याची माहिती  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली.  बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक अनिल सोनवणे, प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा, वसुमना पंत, जिल्हा नियोजन अधिकारी रमेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, सीएसआर अंतर्गत तयार करण्यात येणा:या मॉडेल स्कुलबाबत केंद्रप्रमुखांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे. स्मार्ट अंगणवाडी  तयार करण्यासाठी आवश्यक    सुविधा देण्यासाठी 150 अंगणवाड्यांची यादी तात्काळ तयार करण्यात यावी. उत्तम सुविधांचा शाळांना उपयोग होण्यासाठी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तेथील विद्युत व्यवस्था सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी. अतिदुर्गम भागातील आरोग्य केंद्राच्या आवश्यक दुरुस्तीबाबत प्रस्ताव तयार करण्यात यावे. या भागातील संस्थात्मक प्रसूतीच्या संख्येत वाढ होण्यासाठी एएनएम आणि आशा कार्यकर्ती यांच्यात जागरूकता येण्यासाठी त्यांना प्रशिक्षीत करावे. निधर्ाीत मानके न गाठणा?्या उपकेंद्रांवर विशेष लक्ष देण्यात यावे. बालकांचे आरोग्य आणि पोषणाबाबत पालकांचे समुपदेशन करयात यावे, असे त्यांनी सांगितले. विद्याथ्र्यांना लेखन-वाचन क्षमता ओळखण्यासाठी प्राथमिक शाळेत चाचणी घेण्याचे निर्देश   डॉ.भारुड यांनी दिले. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान कठोरपणे राबविण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.  जिल्ह्यात 13 सामाजिक संस्था विविधि विकासात्मक कार्यात प्रशासनाच्या सोबतीने काम करीत आहेत. माझगाव डॉक, भारत पेट्रोलिअम, एचपीएल आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या चार संस्था सीएसआरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार आहेत.