नंदुरबारातून १५ लाखांचे अवैध मद्य केले जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 11:34 IST2019-03-16T11:33:56+5:302019-03-16T11:34:17+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभाग : दहा ठिकाणी केली कारवाई

नंदुरबारातून १५ लाखांचे अवैध मद्य केले जप्त
नंदुरबार : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने १० ठिकाणी केलेल्या कारवाईत १५ लाख ११ हजार रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला. कारवाईची ही मोहिम यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली.
जिल्ह्यात निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अवैध दारू विक्री व साठ्यावर कारवाई करण्यात येत आहे. नंदुरबार विभागाकडे असलेले कमी मणुष्यबळ लक्षात घेता धुळे जिल्ह्यातून मणुष्यबळ मागविण्यात आले. त्यानंतर केलेल्या कारवाईत एकुण १५ लाख ११ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. अक्कलकुवा-खापर रस्त्यावर तसेच इतर ठिकाणी ही कारवाई झाली. पंजाबमध्ये निर्मित परंतु महाराष्टÑात विक्रीसाठी प्रतिबंधीत असलेले मद्य पीकअप वाहनातून (क्रमांक एमएच ०४- डीएस ९०५८) जप्त करण्यात आले. एकुण २३४ खोके व वाहन यांचा त्यात समावेश आहे.
शुभम जगदीश राजपूत, प्रवीन सुदाम चौधरी, जयेश सुरेश चौधरी, कुंदन मधुकर चौधरी सर्व रा.नंदुरबार, मनोज लक्ष्मण पाडवी रा.खांडबारा, माणिक शिरसाठ, कृष्णा चौधरी रा.अक्कलकुवा, सुनील तडवी रा.तळोदा यांच्यावर कारवाई करण्यात आली.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक मोहन वर्दे, डॉ.मनोहर अंचूळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक महाडीक, दुय्यम निरिक्षक शैलेंद्र मराठे, व्ही.बी.पवार, प्रकाशा गौडा, मनोज संबोधी, क्षिरसागर, गायकवाड, अतुल शिंदे, भट्टाचार्य बागले, वहाडे, धनराज पाटील, हितेश जेठे, राजेंद्र पावरा, अजय रायते, हेमंत पाटील, अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक योगेश राऊत व सहकारी यांनी ही कारवाई केली.
दरम्यान, भरारी पथकाने खांडबारा येथे धाड टाकून ४५ हजर २०० रुपयांचे मद्य जप्त केले. खांडबारा येथे धानोरा रस्त्यावर दुचाकीवरून (क्रमांक एमएच ३९- एए ६२३०) मद्य घेवून जाणाऱ्या व्यक्तीला पथकाने अडविले. त्याच्याकडे एकुण ४५ हजार रुपयांचे अवैध मद्य आढळून आले. याबाबत मनोज लक्ष्मण पाडवी, रा.खांडबारा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.