राष्ट्रीय लोक अदालतीत दीड कोटीची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:20 PM2019-12-15T12:20:07+5:302019-12-15T12:20:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधी व सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयाच्या आवारात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ७१० प्रकरणांचा ...

1.5 crore recovered in National Lok Adalat | राष्ट्रीय लोक अदालतीत दीड कोटीची वसुली

राष्ट्रीय लोक अदालतीत दीड कोटीची वसुली

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : विधी व सेवा प्राधिकरणच्या माध्यमातून जिल्हा न्यायालयाच्या आवारात झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ७१० प्रकरणांचा निवाडा करत दीड कोटी रुपयांची रक्कम वसुल करण्यात आली़ या उपक्रमात दुरावलेल्या एका जोडप्याचे मनोमिलनही न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून करण्यात आले़
शनिवारी जिल्हा न्यायालयाच्या आवारात झालेल्या या उपक्रमात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रमोद एस़तरारे, विधी व सेवा प्रधिकरणचे सचिव एस़टी़मलिये, तदर्थ जिल्हा न्यायाधीश ए़एस़भागवत, वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एल़डीग़ायकवाड, मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही़जी़चव्हाण, सहायक दिवाणी न्यायाधीश एस़ए़विराणी यांनी पॅनलप्रमुख म्हणून काम पाहिले़ त्यांना अ‍ॅड़ ए़बी़सोनार, अ‍ॅड़विनया मोडक, अ‍ॅड़ ए़आऱराजपूत, अ‍ॅड़एऩआऱगिरासे, अ‍ॅड़ के़एच़सावळे, अ‍ॅड़ उमा चौधरी, अ‍ॅड़ मसुदा शेख यांच्यासह विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एऩडी़ चौधरी यांनी मदत केली़ न्यायालयात दिवाणी प्रकरणे, मोटार अपघात, धनादेश अनादर, कौटूंबिक वाद, फौजदारी, बँक वसुली, वीज थकबाकी वसुली आणि पाणी पट्टी घरपट्टी वसुलीची विविध प्रकरणे दाखल करण्यात आली होती़ यातील ७१० प्रकरणे निकाली काढण्यात पॅनल प्रमुखांना यश आले़
दरम्यान गिरीष सुरेश सोनवणे आणि विद्या गिरीष सोनवणे या दाम्पत्याच्या अर्जालाही यावेळी निकाली काढण्यात आले़ दोघांमध्ये वैवाहिक संबध पुर्नस्थापित करुन समेट घडवण्यात आला़ दोघांकडून अ‍ॅड़ सावळे व अ‍ॅड़ एस़आऱचौधरी या दोघांनी काम पाहिले़
दिवाणी आणि फौजदारीसह एकूण १२५ प्रलंबित प्रकरणातून ९५ लाख ९९ हजार तर विविध आस्थापनांच्या वसुलीचे ५८५ दाखलपूर्व प्रकरणे याठिकाणी दाखल करण्यात आले होते़ यातून ६१ लाख रुपयांची वसुली करण्यात आली़ एकूण १ कोटी ५७ लाख रुपयांची वसुली न्यायनिवाड्याने करण्यात आले़ दावेदार आणि तक्रारदार यांचे सपूर्ण म्हणणे ऐकून घेत पॅनकडून निवाडा करण्यात आला़ बऱ्याच जणांची प्रकरणे ही १० वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित असल्याने त्यावर तोडगा काढणे शक्य होत नव्हते़ परंतू लोकअदालतीच्या माध्यमातून त्यावर कारवाई करण्यात आली़

लोकअदालतीत प्रलंबित असलेली ४७ दिवाणी प्रकरणे सादर झाली ही सर्व निकाली काढत त्यातून ६ लाख ३ हजार ९५५ रुपयांची वसुली झाली़ २३ मोटार अपघात प्रकरणातून ७४ लाख ९६ हजार, धनादेश अनादराच्या ३९ प्रकरणातून १४ लाख ९९ हजार ४४९ अशा एकूण ९५ लाख ९९ हजार ४०४ रुपयांची वसुली करण्यात आली़ यासोबत प्रत्येकी ८ कौटूंबिक आणि फौजदारी प्रकरणेही निकाली काढण्यात पॅनलला यश आले़
या लोक अदालतीत एकूण ५८५ दाखलपूर्व प्रकरणेही निकाली काढण्यात आली़ यातून ६१ लाख ८१ हजार ९१४ रुपयांची वसुली करण्यात आली़ यात बँक वसुलीची ६१ प्रकरणे निकाली निघाली़ त्यातून ५७ लाख ६७ हजार ७५६ रुपये वसुल झाले़ वीज थकबाकीदारांची तब्बल १८ प्रकरणे याठिकाणी ठेवण्यात आली़ यातून ७९ हजार २४० वसुली झाली़ पाणीपट्टी, घरपट्टी यांची ५०६ प्रकरणे याठिकाणी ठेवण्यात आली यातून ३ लाख ३४ हजार ९१८ रुपयांची वसुली झाली़

Web Title: 1.5 crore recovered in National Lok Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.