११३ वर्षीय सुभान गिरासे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 05:01 IST2018-08-06T05:01:39+5:302018-08-06T05:01:46+5:30

लंगडी भवानी ता़ शहादा येथील ११३ वर्षे वयाच्या सुभान शिपला गिरासे (पावरा) यांचे शनिवार सायंकाळी निधन झाले.

113-year-old Subhan Dirtase passes away | ११३ वर्षीय सुभान गिरासे यांचे निधन

११३ वर्षीय सुभान गिरासे यांचे निधन

नंदुरबार : लंगडी भवानी ता़ शहादा येथील ११३ वर्षे वयाच्या सुभान शिपला गिरासे (पावरा) यांचे शनिवार सायंकाळी निधन झाले़ ते नंदुरबार जिल्ह्यातील सर्वांत वयोवृद्ध होते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे़ त्यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले़
सुभान यांचा जन्म १९०५ साली झाला होता. पूर्णत: निर्व्यसनी असलेल्या सुभान यांना ५ मुले आणि ४ मुली आहेत़ मुले, सुना व नातवंडे यांच्यासह त्यांचे ३५ जणांचे कुटुंब आहे़ चार पिढ्या पाहणारे सुभान अखेरपर्यंत शेतशिवारात जात होते़ तसेच गावातील सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असे.

Web Title: 113-year-old Subhan Dirtase passes away

टॅग्स :Deathमृत्यू