आमला येथे एक लाख ११ हजारांचा गांजा जप्त
By मनोज शेलार | Updated: April 5, 2024 17:02 IST2024-04-05T17:01:04+5:302024-04-05T17:02:05+5:30
आमला येथे एका जणाकडे गांजा असल्याची माहिती धडगाव पोलिसांना मिळाली होती. पो

आमला येथे एक लाख ११ हजारांचा गांजा जप्त
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील आमला येथे पोलिसांनी धाड टाकून एक लाख ११ हजार रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांनुसार, आमला येथे एका जणाकडे गांजा असल्याची माहिती धडगाव पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी आमला गावात जाऊन संशयित करणसिंग पावरा याच्या घरावर पाळत ठेवली. माहितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी घरात धाड टाकून तपासणी केली असता १५ किलो ८९० ग्रॅम गांजा आढळून आला.
सात हजार रुपये किलो या भावाने गांजा विक्री केला जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी एकूण एक लाख ११ हजार २३० रुपयांचा गांजा जप्त केला. याप्रकरणी करणसिंग ओटला पावरा (३७), रा. आमला, ता. धडगाव याच्याविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक पठाण करीत आहे.