जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:11 IST2021-02-05T06:11:22+5:302021-02-05T06:11:22+5:30
चौकट- जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या संदर्भाने शिक्षकांना कामे करावी लागतात. गावागावांत निर्माण केलेल्या शौचालयांची नोंदणी असो ...

जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे
चौकट- जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध योजनांच्या संदर्भाने शिक्षकांना कामे करावी लागतात. गावागावांत निर्माण केलेल्या शौचालयांची नोंदणी असो की, एखाद्या योजनेची जनजागृती असो, ही कामे शिक्षकांना वेळ नसतानाही पूर्ण करावी लागतात. त्यामुळे अध्यापनाकडे दुर्लक्ष होते. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
चौकट- जिल्ह्यात एकशिक्षकी शाळा एकच आहे. मात्र, कमी शिक्षक असलेल्या शाळा अधिक आहेत. अशा वेळी शासनाच्या आदेशांचे पालन करण्यासाठी शिक्षकांना पूर्णवेळ द्यावा लागतो. त्याचा परिणाम शिक्षणावर होतो. विशेषत: ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
चौकट- न्यायालयाने निवडणूक व जनगणना या दोन कामांशिवाय इतर कोणतीही कामे शिक्षकांना देऊ नये, असे आदेश दिले आहेत. मात्र, या आदेशाचे पालन होत नाही. शिक्षकांना अध्यापनाशिवाय इतरच कामे अधिक करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्यास वेळ कमी मिळत आहे. शाळेतील कामाशिवाय इतर कामे लादण्यात येऊ नये, अशी आमची मागणी आहे. - मधुकर उन्हाळे, राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद.
चाैकट- शासनाच्या आदेशानुसार शिक्षकांना काही जबाबदा-या द्याव्या लागतात. अशा वेळी संबंधित काम वेळेत पूर्ण करावे लागते. असे असले तरी शिक्षकांना अध्ययन व अध्यापनासाठी जास्त वेळ मिळाला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची पडताळणी करूनच निर्णय घेतले जातात.
- प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, नांदेड