शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचे पाणी गांजेगावपर्यंत पोहचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 00:45 IST

गेल्या १५ दिवस बेमूदत आंदोलन केल्यानंतर मंजूर करण्यात आलेले २ दलघमी पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार यवतमाळचे पाणी गांजेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहचले़

ठळक मुद्देदोन दलघमी पाणी सोडले पळसपूर, कोपरावासियांवर पुन्हा पाणीटंचाईचे संकट

हिमायतनगर : गेल्या १५ दिवस बेमूदत आंदोलन केल्यानंतर मंजूर करण्यात आलेले २ दलघमी पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार यवतमाळचे पाणी गांजेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहचले़परंतु नांदेड जिल्ह्याचे मंजूर ७ दलघमी पाणी अद्याप बोरीच्या पुलापर्यंत देखील आले नसल्याने शेतकरी वर्गात प्रशासनाच्या धीम्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडून दिलासा द्यावा, अन्यथा शेतक-यांना पुन्हा आंदोलन करावे लागेल, असा इशारा नदीकाठावरील शेतक-यांनी दिला आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणारी पैनगंगा नदी ही नदीकाठावरील गावक-यांची कामधेनू आहे. या नदीमध्ये गेल्या ४ महिन्यापासून पाणी नसल्यामुळे दोन्ही भागातील ९० गावच्या शेतक-यांनी आंदोलन केले होते़ त्यानंतर शासनाला जाग आली. १५ व्या दिवशी नांदेड जिल्हाधिका-यांनी ७ दलघमी आणि यवतमाळच्या जिल्हाधिकारी यांनी ५ दलघमी पाणी सोडण्यास मंजुरीचे पत्र आंदोलनकर्त्यांना देऊन इसापूरचे कार्यकारी अभियंता कुरुंदकर यांना तसे आदेश दिले होते़यास जवळपास ९ दिवस लोटले असून यवतमाळ जिल्ह्याचे पाणी पैनगंगा नदीच्या गांजेगाव पुलापुढे गेले असताना देखील नांदेड जिल्हाधिकारी यांनी मंजूर केलेले ७ दलघमी पाणी अद्यापही आंदोलन केलेल्या नदीपात्रात पोचले नाही. त्यामुळे नांदेड जिल्हाधिकारी यांनी मंजुरीच्या दिलेल्या पत्रानुसार पाणी सोडण्यात कुचराई केली की काय..? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ मराठवाड्याचे मंजूर पाणी शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे सहस्त्रकुंड पर्यंत सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे़

  • विदर्भाच्या भागातून पैनगंगा नदीपात्रात आलेले पाणी अजूनही पळसपूरपर्यंत पोहचले नाही़ दरम्यान गांजेगाव बंधा-याखालील शेतक-यांनी निवेदन देऊन गेट काढण्याची मागणी केल्याने गुरुवारी दुपारी दोन गेट काढण्यात आले आहे.

त्यामुळे पळसपूर, कोपरा वासियांना पुन्हा पाणी टंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. ही बाब लक्षात घेता मराठवाड्याचे पाणी नदीपात्र सोडण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे़ त्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या तयारी आहेत़

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater shortageपाणीटंचाईDamधरण