वास्तव मांडताना लेखकाने भयमुक्त व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:51+5:302021-02-05T06:10:51+5:30
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन होते. अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, डॉ. ...

वास्तव मांडताना लेखकाने भयमुक्त व्हावे
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन होते. अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, डॉ. दीपक बच्चेवार, डॉ. पंचशील एकंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
साहित्यकृती स्वत:तून निर्माण होणारा उद्गार असतो, साहित्यकृतीचा जन्म अस्तित्वाशी निगडित असतो. लेखकाचे जगणे नियतीच्या विराट पसाऱ्याशी संबंधित असेल तर लेखनसुद्धा अज्ञेयाशी जोडले जाणे अपरिहार्य आहे. सत्यान्वेषण करण्याची जबाबदारी नियतीने लेखकावर टाकलेली आहे. कल्याणकारी आणि आनंदाचा मार्ग शोधणे आणि हा मार्ग सर्वसामान्य माणसाला उपलब्ध करून देणे लेखकाचे कर्म आहे, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन यांनी ‘लेखकांनी कोणत्याही प्रकारच्या दहशतीला न जुमानता राष्ट्रासाठी स्वत:ला समर्पित केले पाहिजे’ असे सांगितले. पंधरवड्याच्या सर्व उपक्रमांचे संयोजक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. मराठी विभागप्रमुख डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी अहवाल वाचन केले, तर भाषा संकुलाच्या संचालिका डॉ. शैलजा वाडीकर यांनी आभार व्यक्त केले.