शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनाची कामे प्राधान्याने सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 00:45 IST

गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे़

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : सुधा प्रकल्पाच्या उंचीसह दिवशीचा प्रश्नही लागणार मार्गी

भोकर : गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे़ यापुढेही जिल्ह्यातील सिंचनाची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असून लवकरच सुधा प्रकल्पाची उंची, वाघु नदीवरील पिंपळढव प्रकल्प, दिवशी येथील साठवण तलाव आदी कामे मार्गी लागतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.तालुक्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिंचनाच्या मागणीला शासनाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रावणगाव, पिंपळढव येथे बुधवारी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, जि.प. सदस्य तथा कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब रावणगावकर, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, जगदीश पाटील भोसीकर, उपसभापती सूर्यकांत बिल्लेवाड, गणेश राठोड, गुलाबराव चव्हाण, रामचंद्र मुसळे, बाबूराव सायाळकर, उज्ज्वल केसराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना संबंधित विभागाकडून गोदावरी खोºयात पाणी उपलब्धता नसल्याचे कारण सांगितले जात होते. यावर वेळोवेळी शासनस्तरावर बैठका घेवून बाजू मांडून पाठपुरावा करण्यात आला.तसेच गोदावरी खोºयात शंभर टक्के साठवणूक होत नाही आणि २९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो अशी भूमिका मांडली़ नियोजन आणि जलव्यवस्थापन नाशिक यांनी हे म्हणणे मान्य करीत २० जून रोजी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देवून तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्पाची १.१० मीटर उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे २ द.ल.घ.मी. पाणीसाठा वाढून १५० हेक्टर अधिक भाग सिंचनाखाली येणार आहे. तर पिंपळढव येथील वाघु नदीवरील प्रकल्पास मंजुरी मिळून १०७ चौरस किमी क्षेत्रात पाणी साठवण होवून ७०० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे तर दिवशी येथील प्रकल्पासही मंजुरी मिळाली आहे. उर्वरित पाकी येथील काळडोह साठवणतलाव व जाकापूर साठवण तलावाचाही मार्ग मोकळा झाला आहे.चव्हाण यांचा खासदार चिखलीकरांना टोलाआठ वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे सर्व शक्य झाले असून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी एका महिन्यातच याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. 'काल तूप खाल्लं आणि आज रुप आलं' असं होत नसतं, अशा शब्दात खा.चिखलीकर यांचे नाव न घेता चव्हाण यांनी त्यांना टोला लगावला. यावेळी आनंदराव पाटील, शंकरराव तोटेवाड, परमेश्वर वाघमारे, गिरीश कदम, वसंत जाधव, गंगाधर भोंबे, साईनाथ कोटुरवार आदी उपस्थित होते़माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र सरपंच व नागरिकांना दिले़ तेव्हा ग्रामस्थांनी पिंपळढव परिसरातील वाघु नदीवर साठवण तलाव होणार असल्याच्या आनंदात पेढे वाटण्यात आले़

टॅग्स :NandedनांदेडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAshok Chavanअशोक चव्हाणWaterपाणी