शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

महिलांनी आत्मविश्वासाने उद्योगाकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 1:16 AM

परिवर्तनवादी महामानवांच्या आणि महानायिकांच्या विचारांचा वारसा घेऊन मराठा समाजातील महिलांनी आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर होवून स्वावलंबी होण्यासाठी उद्योग क्षेत्रात यावे, असे आवाहन राष्ट्रीय अधिवेशनातील यशस्वी उद्योजिका, वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले़

ठळक मुद्देजिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय महाअधिवेशन : दुसऱ्या सत्रात मान्यवर उद्योजिका महिलांचे प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : परिवर्तनवादी महामानवांच्या आणि महानायिकांच्या विचारांचा वारसा घेऊन मराठा समाजातील महिलांनी आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर होवून स्वावलंबी होण्यासाठी उद्योग क्षेत्रात यावे, असे आवाहन राष्ट्रीय अधिवेशनातील यशस्वी उद्योजिका, वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले़शहरातील कै़शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या दुस-या सत्रात ‘स्त्री एक संपूर्ण ओळख व व्यक्तिमत्त्व विकास, महिलांनो उद्योजक व्हा’ या विषयावर विविध मान्यवर महिलांनी आपले विचार मांडले़दुसºया सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ़सुनीता कदम तर प्रशिक्षक उषाताई इंगोले पाटील, मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़शुभांगी देवसरकर, डॉ़सोनिया उमरेकर यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉ़रेखा पाटील चव्हाण, जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील रावणगावकर, जि़ प़ सदस्या डॉ़मीनल पाटील खतगावकर, डॉ़नम्रता तरोडेकर, डॉग़ायत्री वाडेकर, डॉ़शीतल भालके आदींची प्रमुख उपस्थिती होती़महिलांना उद्योजिका कशाप्रकारे व्हायचे आणि यशस्वी उद्योजकाचे सूत्र बिझिनेस कोच ट्रेनर उषा पाटील यांनी सविस्तर सांगितले. इंगोले म्हणाल्या, उद्योगामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, असे नियोजन आणि छोटी गुंतवणूक करून उद्योग सुरू करा़ एकट्याला शक्य नसेल तर समूह बनवून थोडे थोडे पैसे टाकून उद्योग, व्यापार सुरू करून त्यात यशस्वी होण्यासाठी उत्पन्न ते मार्केटिंग या सर्व बाबी स्वत: करणे गरजेचे आहे़ उद्योग लहान असो वा मोठा असो त्याची प्रसिद्धी, प्रचार योग्य पद्धतीने होणे काळाची गरज असून लोकांना हवं ते उत्पादित करण्याचे उद्दिष्ट ठेवून उद्योगाील बना, असे आवाहन उषा इंगोले यांनी केले़ तसेच वेगवेगळी उदाहरणे देवून यशस्वी उद्योजिका होण्याचे सूत्र महिलांना सांगितले़ वेगवेगळ्या चित्रफिती दाखवून महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहित केले़डॉ़मीनल पाटील खतगावकर म्हणाल्या, पुरूषप्रधान संस्कृती यासह विविध नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवावा़ कोणत्याही क्षेत्रात एकमेकांचे पाय न ओढता आजच्या मार्गदर्शनातून सकारात्मक बोध घेऊन चिंतन करावे आणि प्रगती साधावी, असे आवाहन डॉ़पाटील यांनी केले़यानंतर झालेल्या सत्रात गृहिणी, मध्यमवर्ग अनुभव, अपेक्षा, सूचना व मराठा महिलांसमोरील आव्हाने व कृतिशील उपाय या विषयावरील चर्चासत्रात वंदना घोगरे, अनुराधा देशमुख, शिल्पा देशमुख, मायाताई गावंडे, संगीता दांडेगावकर, साधना देशमुख, वंदना चव्हाण यांनी सहभाग घेतला़ विचारवंत गंगाधर बनबरे यांनी ‘सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील महिलांचे स्थान व आजची गरज, समस्या व उपाय, शिवधर्म’ यावर मार्गदर्शन केले. तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणीचा कार्यक्रम झाला़ सूत्रसंचालन डॉ़ उषा कदम यांनी केले. सरस्वती धोपटे यांनी आभार मानले़निरोगी आरोग्यासाठी योग्य आहाराची गरजडॉ. शुभांगी देवसरकर आणि डॉ.सोनिया उमरेकर यांनी ‘स्त्री एक संपूर्ण ओळख सर्व अंगाने महिलांच्या शारीरिक समस्या व त्यावरील उपाय’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले़ डॉ़देवसरकर म्हणाल्या, आहार आणि विहार योग्य नसल्याने आजार वाढत आहेत़ त्यामुळे महिलांनी उपासतापास सोडून संतुलित आहार घेणे गरजेचे आहे़ मुलीमध्ये वाढत्या वयानुसार होणारे बदल लक्षात घेऊन आईने मुलीला मैत्रिणीची वागणूक दिली पाहिजे़ आई-मुलींचे नाते एवढे घट्ट असावे की तिने संपूर्ण बदल, आजाराविषयी नि:संकोचपणे आपल्याकडे व्यक्त झाले पाहिजे़

महिलांनी आत्मविश्वासाने उद्योगाकडे वळावेजिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय महाअधिवेशन : दुसऱ्या सत्रात मान्यवर उद्योजिका महिलांचे प्रतिपादनलोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : परिवर्तनवादी महामानवांच्या आणि महानायिकांच्या विचारांचा वारसा घेऊन मराठा समाजातील महिलांनी आर्थिक, सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम, आत्मनिर्भर होवून स्वावलंबी होण्यासाठी उद्योग क्षेत्रात यावे, असे आवाहन राष्ट्रीय अधिवेशनातील यशस्वी उद्योजिका, वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले़शहरातील कै़शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय महाअधिवेशनाच्या दुसºया सत्रात ‘स्त्री एक संपूर्ण ओळख व व्यक्तिमत्त्व विकास, महिलांनो उद्योजक व्हा’ या विषयावर विविध मान्यवर महिलांनी आपले विचार मांडले़दुसºया सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ़सुनीता कदम तर प्रशिक्षक उषाताई इंगोले पाटील, मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़शुभांगी देवसरकर, डॉ़सोनिया उमरेकर यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉ़रेखा पाटील चव्हाण, जिल्हाध्यक्षा सुरेखा पाटील रावणगावकर, जि़ प़ सदस्या डॉ़मीनल पाटील खतगावकर, डॉ़नम्रता तरोडेकर, डॉग़ायत्री वाडेकर, डॉ़शीतल भालके आदींची प्रमुख उपस्थिती होती़महिलांना उद्योजिका कशाप्रकारे व्हायचे आणि यशस्वी उद्योजकाचे सूत्र बिझिनेस कोच ट्रेनर उषा पाटील यांनी सविस्तर सांगितले. इंगोले म्हणाल्या, उद्योगामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, असे नियोजन आणि छोटी गुंतवणूक करून उद्योग सुरू करा़ एकट्याला शक्य नसेल तर समूह बनवून थोडे थोडे पैसे टाकून उद्योग, व्यापार सुरू करून त्यात यशस्वी होण्यासाठी उत्पन्न ते मार्केटिंग या सर्व बाबी स्वत: करणे गरजेचे आहे़ उद्योग लहान असो वा मोठा असो त्याची प्रसिद्धी, प्रचार योग्य पद्धतीने होणे काळाची गरज असून लोकांना हवं ते उत्पादित करण्याचे उद्दिष्ट ठेवून उद्योगाील बना, असे आवाहन उषा इंगोले यांनी केले़ तसेच वेगवेगळी उदाहरणे देवून यशस्वी उद्योजिका होण्याचे सूत्र महिलांना सांगितले़ वेगवेगळ्या चित्रफिती दाखवून महिलांना उद्योगासाठी प्रोत्साहित केले़डॉ़मीनल पाटील खतगावकर म्हणाल्या, पुरूषप्रधान संस्कृती यासह विविध नकारात्मक गोष्टी बाजूला ठेवावा़ कोणत्याही क्षेत्रात एकमेकांचे पाय न ओढता आजच्या मार्गदर्शनातून सकारात्मक बोध घेऊन चिंतन करावे आणि प्रगती साधावी, असे आवाहन डॉ़पाटील यांनी केले़यानंतर झालेल्या सत्रात गृहिणी, मध्यमवर्ग अनुभव, अपेक्षा, सूचना व मराठा महिलांसमोरील आव्हाने व कृतिशील उपाय या विषयावरील चर्चासत्रात वंदना घोगरे, अनुराधा देशमुख, शिल्पा देशमुख, मायाताई गावंडे, संगीता दांडेगावकर, साधना देशमुख, वंदना चव्हाण यांनी सहभाग घेतला़ विचारवंत गंगाधर बनबरे यांनी ‘सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील महिलांचे स्थान व आजची गरज, समस्या व उपाय, शिवधर्म’ यावर मार्गदर्शन केले. तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राची लोककला असलेल्या लावणीचा कार्यक्रम झाला़ सूत्रसंचालन डॉ़ उषा कदम यांनी केले. सरस्वती धोपटे यांनी आभार मानले़निरोगी आरोग्यासाठी योग्य आहाराची गरजडॉ. शुभांगी देवसरकर आणि डॉ.सोनिया उमरेकर यांनी ‘स्त्री एक संपूर्ण ओळख सर्व अंगाने महिलांच्या शारीरिक समस्या व त्यावरील उपाय’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले़ डॉ़देवसरकर म्हणाल्या, आहार आणि विहार योग्य नसल्याने आजार वाढत आहेत़ त्यामुळे महिलांनी उपासतापास सोडून संतुलित आहार घेणे गरजेचे आहे़ मुलीमध्ये वाढत्या वयानुसार होणारे बदल लक्षात घेऊन आईने मुलीला मैत्रिणीची वागणूक दिली पाहिजे़ आई-मुलींचे नाते एवढे घट्ट असावे की तिने संपूर्ण बदल, आजाराविषयी नि:संकोचपणे आपल्याकडे व्यक्त झाले पाहिजे़

टॅग्स :sambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडNandedनांदेड