स्त्रियांनी स्वाभिमान जपून सामाजिक कार्य करावे : प्रा. डॉ. कविता सोनकांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:30 IST2021-02-06T04:30:42+5:302021-02-06T04:30:42+5:30
अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने नवीन नांदेड सिडको येथे घेण्यात आलेल्या डॉ. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी व्याख्यानमालेत डॉ. अण्णाभाऊ साठे ...

स्त्रियांनी स्वाभिमान जपून सामाजिक कार्य करावे : प्रा. डॉ. कविता सोनकांबळे
अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या वतीने नवीन नांदेड सिडको येथे घेण्यात आलेल्या डॉ. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी व्याख्यानमालेत डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान देताना प्रा. डॉ. सोनकांबळे यांनी हे उद्गार काढले. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. राजश्री ढवळे सावरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणातून अण्णाभाऊंच्या नायिका या शूर असल्याचे सांगितले.
अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्सच्या सिडको शहराध्यक्षा भाग्यश्री करंदीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी त्यांनी महिलांना अण्णाभाऊ साठे पीपल्स फोर्समध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी मंदाताई गवाले, निर्मलाबाई घोडजकर, बालिका शिंदे, संजिवनी दोडके, पुष्पा कुद्रे, राऊत काकू, शोभा सोनसळे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अनिशा दोडके हिने केले. अश्विनी दोडके हिने आभार मानले.