रांगोळी काढण्यात मग्न महिलेचे गंठन हिसकावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 13:24 IST2020-10-26T13:18:38+5:302020-10-26T13:24:41+5:30
Chain Snatching सोनसाखळी चोराने त्यांच्या पाठीमागून येऊन हिस्सका देत गळ्यातील तीन तोळ्याचे गंठन पळविले.

रांगोळी काढण्यात मग्न महिलेचे गंठन हिसकावले
नांदेड- घराबाहेर अंगणात रांगोळी काढताना सोनसाखळी चोराने एका महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण पळवल्याची ही खळबळजनक घटना सोमवारी सकाळी ७ वाजता घडली.
शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या अंबेकर नगरमधील रहिवासी पुष्पा उत्तरवार ह्या सकाळी आपल्या घरासमोर रांगोळी काढत होत्या. यावेळी सोनसाखळी चोराने त्यांच्या पाठीमागून येऊन हिस्सका देत गळ्यातील तीन तोळ्याचे गंठन पळविले. ही संपुर्ण घटना सिसीटीव्हीत कैद झाली आहे. उच्चभ्रू वसाहतीत सकाळी घडलेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भितीचं वातावरण निर्माण झालं आहे...पोलिसांनी सिसीटीव्हीवरुन चोरट्याचा शोध सुरू केला आहे.