लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : हवामान खात्याने येत्या तीन दिवसांत मराठवाड्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तविला होता़ त्यानुसार रविवारी शहरासह जिल्ह्यातील निवघा बाजार, भोकर, गुंडवळ, मुदखेड, माहूर, मनाठा, हदगाव आदी परिसरात पाऊस झाला़ त्यामुळे रबीच्या पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले़ तर हरभ-याच्या गंजी, ज्वारीची कणसे झाकून ठेवण्यासाठी शेतक-यांची तारांबळ उडाली़रविवारी पहाटेच्या सुमारास नांदेड शहरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या़ यानंतर दिवसभर ढगाळ वातावणासह वेगाने वारे वाहू लागले़ सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाºयाने दुकानदारांसह नागरिकांची धांदल उडाली होती़ काही ठिकाणी बॅनर तुटून रस्त्यावर पडले़नांदेडसह परिसरात काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून गारठा पडला आहे़ तर बुधवारी दिवसभर नांदेडकरांना सूर्यदर्शन झाले नव्हते़ यानंतर शनिवारी सायंकाळपासूनच वा-याचा वेग वाढला होता़ दरम्यान, रविवारी शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या़ तर दुपारनंतर झालेल्या वादळी वा-यामुळे नागरिकांची धावपळ झाली़ श्रीनगर परिसरात लावलेले होर्डिंग्ज वादळी वा-याने रस्त्यावर येवून पडल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता़ तर नवीन मोंढ्यातील शेतमाल झाकून ठेवण्यासाठी व्यापा-यांसह हमालांची धावपळ झाली़शहरातील सांगवी, चौफाळा, देगलूरनाका परिसरात पावसाचे प्रमाण अधिक होते़ काही नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाली तर दुकानासमोर ठेवलेले बॅनर, खुर्च्या आदी साहित्य वा-याने रस्त्याने पडत होते़ असेच चित्र शहरातील कॅनॉल रस्ता भागातही पहायला मिळाले़ हा रस्ता मोकळा असल्याने रस्त्यालगत असलेल्या दुकानांमध्ये वावटळीप्रमाणे धूळ गेली़ तर बाहेर ठेवलेले साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरले होते़
निवघा बाजार परिसरात गारपीटनिवघा बाजार : रविवारी दुपारी निवघा परिसरात गारांसह पाऊस झाला़ त्यामुळे गहू, हरभरा, आंबा या पिकांचे नुकसान झाले़ तळणी, वाकी, उंचेगाव बु़, आमगव्हाण, इरापूर, शिऊर, कोळी, साप्ती आदी भागात हरभरा पिकाची दुबार पेरणी झाल्याने हरभरा पीक काढणीस उशिरा आले़ सध्या हरभरा काढणीचे काम सुरू असल्याचे शेतकºयांची तारांबळ उडाली़ तर गहू पीक भुईसपाट झाले आहे़ विजांच्या कडकडाटांसह पाऊस झाला़ पावसात जोराचा वारा असल्याने अनेकांच्या हरभरा ढिगावरील ताडपत्री, घरावरील पत्रे उडून गेले़ तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली़४मुदखेड : मुदखेड तालुक्यातील अनेक ठिकाणी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सायंकाळी विजांच्या कडकडाटांसह अर्धा तास पाऊस झाला. मुदखेड शहरात रविवारचा आठवडी बाजार चालू होता़ तो पावसामुळे विस्कळीत झाला. भाजीपाल्याचे भाव आजच्या बाजारात कमी होते. गेल्या सात-आठ आठवड्यात टोमॅटो ५ रुपये, वांगी ७ रुपये, फूलकोबी, पानकोबी १० रुपये प्रतिकिलो आणि मेथी जुडी १० रुपयांत ४ तर पालक जुडी २ या भावाने मिळत आहे. आजच्या पावसाने बाजार विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले़पावसाने भाजीपाल्याचे नुकसानहदगाव : आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते़ संध्याकाळपर्यंत मनाठा, तामसा, निवघा, हदगाव मंडळात तुरळक पाऊस झाला़ शेतातील गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले़ तर हवेमुळे आंब्याचा मोहर व शेतातील भाजीपाल्याचेही नुकसान झाले़ मनाठा येथे सकाळी १० वाजता पावसाला रिमझीम सुरुवात झाली़ यामुळे शेतात गहू कापून टाकलेला जमवाजमवी करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू झाली़ पाण्यामुळे त्यांचे नुकसान झाले़ अनेकांनी ढग मारून झाकून ठेवले़ पण ज्याची कापणीच केली नाही त्याचे मात्र नुकसान झाले़ शेतातील फळभाज्यांचे नुकसान झाले़ तर आंब्याचा मोहर, चिंचाही गळून पडल्या़ ढगाळ वातावरणामुळे निवघा बाजार, बामणी फाटा येथील आठवडी बाजार थंडच होता़वीज कोसळून वैरणासह शेती अवजारे खाकहदगाव : नायगाव तालुक्यातील टाकळी त.मा.येथे गावालगत राजीव देवराव जाधव यांच्या झोपडीवर वीज कोसळून आग लागली़ यामध्ये वैरणासह शेती अवजारे जळून खाक झाले़ ही घटना रविवारी रात्री सव्वा सात वाजता घडली.रविवारी विजांचा कडकडाटांसह वारा सुटला. रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास झोपडीवर वीज कोसळून झोपडीतील साहित्य जळाले़ परंतु, गावकºयांनी आग विझविल्याने झोपडी शेजारी असलेले हणमंत सुभाष तमशेट्टे यांचे घर आगीच्या विळख्यापासून सुरक्षित राहिले़ आग विझविण्यासाठी सरपंच भगवान शेवाळे, बालाजी कुरे, लिगोंजी पाटील, जयवंत लाडेकर, मालू झेलेकर, दत्ता जाधव, माधव डांबरगे, बालाजी शेवाळे आदींनी परिश्रम घेतले़ गडगा परीसरात अवकाळी पावसाने रबी पिकांना फटका बसला़वादळी वा-याने हरभ-यासह गव्हाचे नुकसानवादळी वा-याने काही ठिकाणी रबी ज्वारीचे पीक आडवे झाले तर कापून ठेवलेल्या हरभ-याच्या गंजी शेतात अस्ताव्यस्त पसरल्या़ काही ठिकाणी गव्हाचे उभे पीक आडवे झाले़ काही ठिकाणी आंब्याचा मोहर गळून नुकसान झाले़ दिवसभरात कुठेही मोठा पाऊस झाला नसला तरी वादळी वाºयामुळे हरभरा, गहू पिकांचे नुकसान झाले़ जिल्ह्यात हरभरा आणि हळदीचे प्रमाण अधिक आहे़येणाºया काळात पाऊस झाल्यास हळद, हरभरा, ज्वारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू शकते़ त्यामुळे हाती आलेले रबीचे पीक जाते की काय? या भीतीने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे़बहाद्दरपु-यात हरभ-याचे नुकसानबहाद्दरपुरा : बहाद्दरपुरा ता़ कंधार येथे सायंकाळी पावणेसातच्या सुमारास विजांच्या कडकडाटांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला़ परिसरात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते़ मात्र रविवारी सायंकाळी ढगांची गर्दी झाली़ विजांच्या कडकडाटांसह पावसास सुरूवात झाली़ त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले़ बहाद्दरपुरा परिसरात मन्याड नदीला पाणी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रबीचे पीक लावण्यात आले़ नुकतेच हरभरा पिकाची कापणी चालू असून शिवारात उघड्यावर हरभरा टाकण्यात आला आहे़ या पिकाचे मोठे नुकसान झाले़