शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्राच्या आधारे विधवा महिलेचे घर हडपले; कामठ्याच्या आजी-माजी सरपंचाविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 12:54 IST

बनावट कागदपत्रे तयार करून एका विधवा महिलेचे घर हडप करणार्‍या तालुक्यातील कामठा बु.येथील आजी-माजी सरपंचासह पाच जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वे गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देकामठा बु. येथे सरस्वती पंडीतराव दादजवार आपल्या परिवारासह राहतात. पंडीतराव दादजवार यांचे १४ डिसेंबर २००४ मध्ये निधन झाले.. पतीच्या नावे असलेली ही मालमत्ता आपल्या नावे करून घेण्यासाठी कामठा ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या.यावेळी त्यांची मालमत्ता पुंडलिक नारायण गाढवे यांनी आपल्या नावे करून घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले.

अर्धापूर (नांदेड ) : बनावट कागदपत्रे तयार करून एका विधवा महिलेचे घर हडप करणार्‍या तालुक्यातील कामठा बु.येथील आजी-माजी सरपंचासह पाच जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वे गुन्हा दाखल करण्यात आला.

कामठा बु. येथे सरस्वती पंडीतराव दादजवार आपल्या परिवारासह राहतात. कामठा येथे त्यांच्या पतीच्या नावे ग्रामपंचायती मिळकत क्रमांक ३६६ आहे. पंडीतराव दादजवार यांचे १४ डिसेंबर २००४ मध्ये निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले व तीन मुली असा परिवार आहे. पतीच्या नावे असलेली ही मालमत्ता आपल्या नावे करून घेण्यासाठी कामठा ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या. त्यांनी आपले नाव परिवर्तनासाठी अर्ज केला. यावेळी त्यांची मालमत्ता पुंडलिक नारायण गाढवे यांनी आपल्या नावे करून घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले. पुंडलीक गाढवे यांनी माझी मालमत्ता कशाच्या आधारे परीवर्तीतकरुन घेतली याचा खुलासा ग्रामपंचायत करु शकली नाही. 

यावेळी त्यांनी आपल्या संपत्तीचा वाद पंचायत समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस ठाणे येथील वरीष्ठांच्या कानावर टाकला परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. आजी-माजी सरपंचाने त्यांना बेघर करण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली या प्रसंगी त्याची  बाजु अँड. ए. आर. चाऊस यांनी मांडली . न्यायालयाने या प्रकरणाचा अभ्यास करून अधार्पूर पोलीसांना संबंधितांची चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी सरस्वती दादजवार यांच्या फियार्दीवरून पुंडलिक गाढवे, ग्रामसेवक एस.बी.पत्रे, सरपंच शिवलिंग उर्फ पिंटु स्वामी, लिपीक कुंडलिक कल्याणकर, तत्कालीन सरपंच लताबाई वाहुळकर  यांच्याविरुद्ध  फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक गायकवाड हे करीत आहेत.

टॅग्स :NandedनांदेडAurangabadऔरंगाबादHomeसुंदर गृहनियोजन