शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोण जुना कोण नवा, यापेक्षा कोण कामाचा हे महत्त्वाचे; 'इनकमिंग'वर अजित पवारांची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 17:11 IST

कामे घेऊन मुंबईला या; पण विनाकारण हेलपाटे मारू नका, आम्हाला पण कामं असतात; अजित पवारांचा नेते-कार्यकर्त्यांना सल्ला

नांदेड : कोण जुना कोण नवा, यापेक्षा कोण कामाचा हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी हा संधी देणारा पक्ष आहे. त्यामुळे कर्तृत्व, नेतृत्व अन् सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या प्रत्येकाला योग्य ती संधी मिळेल. विरोधकांकडे लक्ष न देता काम करीत राहिले पाहिजे. बेरजेचे राजकारण कसे करता येईल. त्यातून विरोधकांनादेखील मान-सन्मान दिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कौठा परिसरातील एका मंगल कार्यालयात आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री नवाब मलिक, आमदार प्रतापराव चिखलीकर, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, सुरेश जेथलिया, यशवंत माने, जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, शहर जिल्हाध्यक्ष जीवनराव घोगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह समर्थकांचा पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ३४ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत नांदेडला अनेक वेळा आलो; पण आज ठिकठिकाणी झालेला सत्कार सोहळा जबाबदारी वाढविणारा आहे. मोहन हंबर्डे यांच्या प्रवेशाने निश्चित पक्षाला फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विष्णूपुरी जलसिंचन योजनेसह कोणत्याही योजनांना निधी कमी पडणार नाही. कामे घेऊन मुंबईला या; पण विनाकारण हेलपाटे मारू नका, आम्हाला पण कामं असतात. स्थानिक पातळीवर लक्ष देऊन संघटनात्मक बांधणीवर भर द्या, असे आवाहन त्यांनी केले.

लहान- मोठे असे काही नसते...काेणाचेही नेतृत्व लहन, मोठे असे काही नसते. जनता जनार्दन सर्वस्व असून तेच ठरवितात, कुणाला किती द्यायचे अन् कुठे बसवायचे. त्यामुळे आपण केवळ काम करत राहायचे, जनता बरोबर न्याय करते, असे मतही पवार यांनी व्यक्त केले. तुमच्या आमच्या कृतीतून आता सर्व घटकांना न्याय मिळाला पाहिजे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रत्येकाला न्याय देणे शक्य नसते. आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदेसह विविध निवडणुकांमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही.

प्रतापराव आता घड्याळ कायम ठेवायचे...चिखलीकर यांनी भाषणात आजपर्यंत कोणकोणत्या पक्षात होतो, कोणत्या चिन्हावर निवडणुका लढविल्या अन् विकासकामे कशी केली, हे त्यांच्या भाषणात सांगितले. तोच धागा पकडत अजित पवार म्हणाले, आता बस झाले. यापुढे काेणत्याही पक्षात जाण्याची गरज नाही. कायम घड्याळ हे चिन्ह लक्षात ठेवायचे अन् निवडणुकांना सामोरे जायचे, असा सल्ला उपमुख्यमंत्री पवार यांनी चिखलीकरांना दिला. जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसाठी सदस्य नोंदणी करण्याबरोबरच महायुती सरकारची कामे घराघरापर्यंत पोहोचवा. प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ द्या, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNandedनांदेडNCPराष्ट्रवादी काँग्रेस