शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडे यांना राखी केव्हा बांधणार ? माहूरगडाकडे जाताना पंकजा मुंडे म्हणाल्या...

By शिवराज बिचेवार | Updated: August 30, 2023 12:36 IST

पंकजा मुंडे दर्शनासाठी माहूरगडाकडे, रक्षाबंधनावर म्हणाल्या, 'रक्ताचे नाते नाकारता...'; 

नांदेड - माहूर आमच कुलदैवत आहे त्यासाठी दर्शनाला आले. शिवशक्ती दर्शन यात्रेमध्ये राज्यातील ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठांचे दर्शन घेणार असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या. येत्या चार तारखेपासून ही यात्रा सुरू होणार नसल्याचे पंकजा यांनी सांगितले.

दोन महिन्यांची सुटी संपवून शिवशक्ती या राज्यव्यापी दौऱ्यापूर्वी माहूर गडावर दर्शनासाठी पंकजा मुंडे आल्या आहेत. दरम्यान, धनंजय मुंडे यांना राखी केव्हा बांधणार या प्रश्नावर पंकजा यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली. महादेव जानकर, हे माझे भाऊ माझ्यासोबत असल्याचे पंकजा म्हणाल्या. जे लोकं मुंडे साहेब असताना आणि मुंडे साहेबांच्या मृत्यूच्या पश्र्चात माझ्या संघर्षात सोबत होते ते आज माझ्यासोबत आहेत. राखी असा विषय असा आहे की कुणी म्हटले मला राखी बांधा तर आपण नाकारू शकत नाही. ही आपली संस्कृती आहे. रक्ताचे नाते नाकारता येत नाहीत. दर्शन झाल्यानंतर बाकीचे कार्यक्रम पार पाडू, असेही पंकजा यावेळी म्हणाल्या. 

दरम्यान, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे मागील दोन महिन्यांपासून राजकीय सुटीवर होत्या. राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला अजित पवार यांची साथ लाभली. प्रथम शिवसेना आणि आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून आमदारांचा एक गट वेगळा होऊन भाजपासोबत सत्तेत बसला आहे. यामुळे राज्याचे राजकारण वेगळ्या टप्प्यावर आले आहे. यातच दोन महिन्यांची सुटी संपताच शिवशक्ती दौऱ्यातून देवदर्शनासह कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्याचे नियोजन करत पंकजा पुन्हा मैदानात उतरल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आशीर्वाद घेण्यासाठी  पंकजा मुंडे माहूर गडाकडे रवाना झाल्या.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेNandedनांदेडDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपा