शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'५ पर्यंत मोजतो अन् मग ठोकतो'; माजी मंत्री सावंत यांच्यावर घरात घुसून रोखले पिस्टल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2022 17:23 IST

आरोपीने बंदूक कानाला लावली असतानाही सेवकाने झटापट करत आडवले

नांदेड- माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांच्या शिवाजीनगर स्थित घरात घुसलेल्या आरोपीने ५० हजार रुपयांची मागणी करीत त्यांच्यासह सेवकावर बंदूक रोखली. यावेळी सेवकासोबत झटापट करुन बंदूकीने डोक्यात मारुन जखमी करण्यात आले. प्रसंगावधान राखत सावंत हे दरवाजाच्या बाहेर पडले. त्याचवेळी धूम ठोकत असलेल्या आरोपीला कार्यकर्त्यांनी पाठलाग करुन पकडले. हा थरार सोमवारी दुपारी तीन साडे तीन वाजेच्या सुमारास घडला.

शिवाजीनगर भागात पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या बंगल्यासमोरच माजी मंत्री डी.पी.सावंत यांचे घर आहे. गेल्या दोन दिवसांपासून सावंत यांच्या भेटीसाठी जनता कॉलनी येथील साहिल माने हा तरुण येत होता. साहिल माने (रा.बीड ) असे नाव त्याने सांगितले होते. तसेच जमीनीच्या एका विषयाबद्दल सावंत यांची मदत मागितली होती. परंतु, सावंत यांनी बीड जिल्हा आपले कार्यक्षेत्र नसल्याचे सांगून त्याला परत पाठविले होते. सोमवारी सकाळपासूनच तो सावंत यांच्या घराजवळ फिरत होता.

सकाळच्या वेळी सावंत हे आयटीएम येथे असताना तो त्यांच्या घरी गेला. यावेळी सेवक सुभाष पवार (रा.आंतरगाव ता.नायगाव) यांनी साहेब आयटीएम येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपी माने याने सावंत यांच्या पीएचा मोबाईल क्रमांक घेतला. परत जात असताना सावंत यांचे वाहन त्याला दिसले. सावंत हे दुपारी जेवण करुन हॉलमध्ये थांबले असताना स्वयंपाकगृहाच्या पाठीमागील दरवाजातून साहिल माने हा आत आला. येताच त्याने सेवक पवार यांना साहेब कुठे आहेत असे म्हणून बंदूक रोखली. अचानक बंदूक डोक्याला लावल्यामुळे पवार हे घाबरले होते. यावेळी दोघांमध्ये झटापट सुरु झाली. आरोपी माने याने बंदूक उलट्या बाजूने पवार यांच्या डोक्यात चार ते पाच वेळेस मारली. त्यामुळे पवार यांचे डोके फुटले.

हा सर्व गोंधळ सुरु असताना हॉलमध्ये असलेले सावंत स्वंयपाकगृहात आले. यावेळी आरोपी माने याने सावंत यांच्या दिशेने बंदूक रोखली. तसेच पैसे देत नसल्यास पवारला गोळ्या घालण्याची धमकी दिली. बोलत-बोलत सावंत यांच्या मागे आरोपी दरवाजापर्यंत आला. तोच सांवत यांनी दरवाजातून बाहेर पाय काढला. बाहेर कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यामुळे पकडल्याच्या जाण्याच्या भितीने आरोपी माने याने पळण्याचा प्रयत्न केला. परंतु संतोष पावडे आणि अन्य कार्यकर्त्यांनी त्याला पाठलाग करुन त्याला पकडले. त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात आरोपीला माने याला देण्यात आले. डीबीचे सपोनि रवि वाहूळे याने आरोपीची झाडाझडती घेवून बंदूक जप्त केली. ही बंदूक छरे चालविण्याची निघाली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पाच पर्यंत मोजतो अन् मग ठोकतोसावंत यांच्यापुढे आरोपी माने याने सेवक पवार यांच्या कानशिलाला बंदूक लावली होती. ५० हजार रुपये देता की नाही, असा सवाल करीत, पाच पर्यंत मोजतो अन् पवारला ठोकतो अशी धमकी त्याने दिली होती. यावेळी सेवक पवार यांनीही हिंम्मत दाखवित त्याच्यासोबत झटापट केली.

मी मेलो तरी चालतेस्वयंपाकगृहातून आरोपी अचानक मध्ये आले. साहेबांचे जेवण होवून ते हॉलमध्ये होते. त्याने येताच मला बंदूक दाखवून साहेबांकडे घेवून जाण्याची धमकी दिली. मी मेलो तरी चालते, पण साहेबांना काही होवू नाही म्हणून मी झटापट केली. त्याने माझ्या डोक्यात बंदूक मारुन डोके फोडले. अशी प्रतिक्रिया जखमी सेवक सुभाष पवार यांनी दिली.

माझ्यावर खुप दबाव होताआरोपी साहिल माने हा बीएच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. तो शहरातील यशवंत महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. काही जणांकडून उधारीवर ५० हजार रुपये घेतले होते. ते लोक पैसे दिले नाही तर, जीवे मारण्याची धमकी देत होते. त्यामुळे सावंत यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेलो. मला सोडू नका माझे एन्काऊंटर करा असे आरोपी साहिल माने हा बडबडत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड