मराठा आरक्षणावर मराठवाड्यातील खासदारांची भूमिका काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:17 IST2021-07-26T04:17:57+5:302021-07-26T04:17:57+5:30
चाैकट.... मराठवाड्यातील नऊ खासदारांवर नजरा राज्यात लाेकसभेचे ४८ पैकी आठ खासदार मराठवाड्याचे आहेत. त्यामध्ये भाजपचे ४, शिवसेना ३, तर ...

मराठा आरक्षणावर मराठवाड्यातील खासदारांची भूमिका काय?
चाैकट....
मराठवाड्यातील नऊ खासदारांवर नजरा
राज्यात लाेकसभेचे ४८ पैकी आठ खासदार मराठवाड्याचे आहेत. त्यामध्ये भाजपचे ४, शिवसेना ३, तर एमआयएमच्या एका खासदाराचा समावेश आहे. भागवत कराड हे राज्यसभा सदस्य आहेत, तर राजीव सातव यांची जागा निधनामुळे रिक्त आहे. त्यापैकी दानवे व कराड केंद्रीय मंत्रिमंडळात आहेत. या नऊ खासदारांच्या भूमिकेकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
चाैकट....
‘छावा’ विचारणार खासदारांना जाब
अशाेकराव चव्हाण यांनी सर्व खासदारांना पत्र दिल्यानंतर आता छावा संघटना या खासदारांना जाब विचारणार असल्याचे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे यांनी ‘लाेकमत’ला सांगितले. काळे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी ५८ माेर्चे निघाले, ४२ समाजबांधवांनी जीवनयात्रा संपविली. मात्र अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटलेला नाही. ओबीसीप्रमाणे मराठा समाजाचे नेते आक्रमकरीत्या समाेर येताना दिसत नाहीत. ही खंत असून, याबाबत त्यांना जाब विचारला जाईल.
काेट....
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दाेन दिवसांपूर्वीच भाजपची बैठक झाली. आरक्षण मिळालेच पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. त्यासाठी सभागृहात आग्रहही धरला जाईल. त्याचा कार्यक्रम ठरविला जात आहे. मात्र आरक्षणाचा विषय राज्याच्या अखत्यारित असून, सरकारने न्यायालयात प्रबळपणे बाजू मांडली नाही. त्यामुळे आरक्षण मिळण्यास विलंब हाेताे आहे.
- प्रतापराव चिखलीकर
खासदार (भाजप), नांदेड
काेट....
बुधवारी शिवसेनेच्या सर्व खासदारांची संजय राऊत यांच्याकडे बैठक झाली. शिवसेनेने लाेकसभा अध्यक्षांना रितसर पत्र दिले असून, मराठा आरक्षणाचा विषय अजेंड्यावर घ्या, एक संपूर्ण दिवस त्यावर सभागृह चालवा, सर्व खासदारांना बाेलू द्या, अशी विनंती करण्यात आली आहे. या आठवड्यात चर्चेचा हा विषय मार्गी लागेल अशी आशा आहे.
हेमंत पाटील
खासदार, हिंगाेली