शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या सभेला कोणते नियम? गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 17:01 IST

अनेक नियम व अटी घातल्यानंतर औरंगाबादमध्ये १ मे रोजी राज ठाकरेंची सभा झाली होती.

नांदेड: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची आज मुंबईत सभा आहे. भाजप आणि मनसे हिदुत्वाच्या मुद्द्यावरून सातत्याने शिवसेनेची कोंडी करत आहेत. यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अनेक नियम व अटी घातल्यानंतर औरंगाबादमध्ये १ मे रोजी राज ठाकरेंची सभा झाली होती. त्यानंतर होणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या सभेला गृह विभाग कोणते नियम लावले, असा सवाल उपस्थित झाला होता. यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज ठाकरे यांच्या सभेला जे नियम लावले गेले तेच नियम मुख्यमंत्र्यांच्या सभेला असतील असे स्पष्ट केले.

हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख राज ठाकरे यांनी 'मशिदी बाहेरील भोंगा हटावा, हनुमान चालीसा लावा' मोहीम जाहीर केली आहे. मुंबई आणि ठाणे येथे झालेल्या सभेनंतर औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांनी १ मे रोजी सभा घेतली. यावेळी सभेला परवानगी देताना पोलिसांनी अनेक अटी व नियम लावले होते. मात्र, सभेनंतर नियमांचे उल्लंघन झाल्याने राज ठाकरे आणि आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे आज होणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेला कोणते नियम लावण्यात आले आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.  आज नांदेड येथे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आले असता त्यांनी यावर उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्या सभेला अनेक नियम व अटी लावण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेलाही त्याच नियम व अटी आहेत का ? या प्रश्नावर गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या सभेलाही तेच नियम व अटी लागू राहणार आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे राज्याचा दौरा करणार, अनेक सभा घेणारमुख्यमंत्री ठाकरे राज्यभरात फिरतील. लोकांच्या समस्या जाणून घेतील. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसी संवाद साधतील. त्यासाठी विभागवार नियोजन सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. आजच्या सभेनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली. आमदारांच्या बैठकादेखील सुरू आहेत. जूनमध्ये शिवसेनेचा स्थापना दिन आहे. त्यावेळी औरंगाबादमध्ये महामेळाव्याचं आयोजन करण्यात येईल, असं राऊत यांनी सांगितलं.

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेNandedनांदेडShiv Senaशिवसेना