शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

'सत्ताधारी आणि विरोधकही आम्हीच' मनपा निवडणुकीतही महायुतीचा प्रयोग यशस्वी होणार का?

By राजेश निस्ताने | Updated: January 9, 2026 20:28 IST

नांदेड महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनीच व्यापली विरोधकांचीही स्पेस

- राजेश निस्ताने, वृत्तसंपादक, नांदेड

नांदेड : वाघाळा महानगरपालिकेतील नगरसेवकांच्या ८१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. निवडणुकीचा आखाडा तापला आहे. गल्लीबोळात प्रचार रॅली निघत आहेत. उमेदवार हात जोडून मते मागत आहेत. मात्र, एकूण गोंधळ पाहता नेमके सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण याबाबत मतदारांमध्येच संभ्रम पाहायला मिळतो. काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी (शरद पवार) या विरोधी पक्षांना संधी मिळू नये म्हणून भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) हे सत्ताधारी घटक पक्षच एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. सत्ताधाऱ्यांनीच विरोधकांचीही स्पेस व्यापली आहे. अलीकडेच झालेल्या नगर परिषद - नगर पंचायतींच्या निवडणुकीत मतदारांना गृहीत धरून 'सत्ताधारी आम्ही आणि विरोधकही आम्हीच' हा भाजप महायुतीचा प्रयोग यशस्वी झाला. तोच प्रयोग आता महानगरपालिकांमध्ये केला जात आहे. परंतु, जागरूक मतदारांनी ही बाब ओळखल्याने हा प्रयोग पुन्हा यशस्वी होतो की फसतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

कोण स्वतंत्र, कोण युतीत, समजेचना?नांदेडमध्ये भाजप स्वबळावर लढत आहे. ८१ पैकी ६७ जागांवर भाजपचे अधिकृत उमेदवार उभे आहेत. काही ठिकाणी सोयीच्या विकास आघाड्या, निकटवर्तीय सक्षम अपक्षांना मैदान मोकळे करून देण्यात आले आहे. शिंदेसेना नांदेड उत्तर मतदारसंघात स्वबळावर लढत आहे. तर दक्षिण मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती करून निवडणूक लढविली जात आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती आहे. उद्धवसेनेचेही ३१ उमेदवार रिंगणात आहेत. तिकडे काँग्रेसला मायनस करण्यासाठी एमआयएम जोर लावून आहे. या सर्व गोंधळात सामान्य मतदारांना कोण स्वतंत्र लढतोय आणि कोण युतीत हे समजणे कठीण झाले आहे. 

शिंदेसेनेचे आमदार भाजपच्या मोहातशिंदेसेनेने भाजपशी युती करण्याचे प्रयत्न चालविले. उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर तर अखेरपर्यंत भाजपच्या मोहात होते. त्यांना अलर्ट करूनही ते सावरले नाहीत. भाजपने त्यांना अक्षरश: झुलवत ठेवले. अखेर त्यांचा भ्रमनिरास झाल्यानंतर त्यांनी भाजपने धोका दिल्याचा टाहो फोडणे सुरू केले. विधान परिषद सदस्य हेमंत पाटील यांनी भाजपची खेळी आधीच ओळखली होती. त्यामुळे त्यांनी उत्तर मतदारसंघ कल्याणकरांच्या भरोशावर सोडून 'आपल्या' दक्षिणची सुत्रे स्वत:कडे घेतली आणि राष्ट्रवादी (अजित पवार)शी युती केली. 

'खास'मुळे आमदारांत मिठाचा खडातरीही उत्तरमध्ये एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय ओएसडीच्या पत्नीचे तिकीट कापल्यावरून सेनेच्या दोन आमदारांमध्ये मिठाचा खडा पडला. आमदार कल्याणकरांचा खासगीत एकेरी उल्लेख करणे ओएसडींना चांगलेच भोवले. कार्यकर्त्यांची घोषणाबाजी आमदारांवर उलटली. हेमंत पाटील यांच्या '१६ तारखेनंतर सर्वांना पाहून घेतो', या इशाऱ्याने सेना नेत्याचा ताप वाढला अन् रुग्णालयात भरती होण्याची वेळ आली. एक आमदार त्या बंडखोर उमेदवाराला सपोर्ट करतोय, तर दुसरा विरोध. तेथे निकाल काय लागतो, यावर पुढची राजकीय समीकरणे आणि एकोपा अवलंबून आहे. हा वाद मिटविण्यासाठी व दोन आमदारांचे मनोमिलन घडवून आणण्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: नांदेडला येणार आहेत.

सूक्ष्म नियोजन, माहोल भाजपचाचउमेदवारीवरून नाराजी जवळपास सर्वच पक्षात आहे. भाजपात नवे-जुने या वादामुळे ती अधिक जाणवते. मात्र, सूक्ष्म नियोजन व प्रचारात माहोल भाजपचाच आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांसह सर्व प्रमुख नेते प्रचाराला येऊन गेले. महापालिकेत बहुमत मिळविण्याचे किमान त्याच्या जवळपास यश मिळविण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. त्याला लगाम लावण्याचा राष्ट्रवादी व शिंदेसेनेचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांना कितपत यश येते, हे वेळच सांगेल. राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची अद्याप प्रतीक्षा आहे. नगरपालिका निवडणुकीत पाठ फिरविलेले उद्धवसेनेचे नेते किमान महापालिका निवडणुकीत तरी येणार का, हा प्रश्न आहे. काँग्रेसमध्ये बरीच सामसूम दिसते. स्थानिक नेतृत्त्वावरच सर्वकाही अवलंबून आहे. काँग्रेसचा भर परंपरागत मतदार मानल्या जाणाऱ्या दलित, मुस्लिम क्षेत्रात अधिक आहे. परंतु, तेथे एमआयएमने काँग्रेसची डोकेदुखी वाढविली आहे. काँग्रेसच्या नेत्यांना खासदार असदोद्दीन ओवेसी खुले आव्हान देऊन गेले. शहरात वास्तव्यास असलेल्या खासदार, आमदारांच्या प्रभागात त्यांच्या पक्षाचे पूर्ण पॅनल निवडून येते का, यावर त्या नेत्यांची आपल्या रहिवासी भागातील लोकप्रियता स्पष्ट होणार आहे.

'त्या' अपहृताला पाठबळ कोणाचे?या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसांचे अपहरण व मारहाणीचा मुद्दा गाजतो आहे. त्यात राष्ट्रवादीच्या आजी - माजी आमदारांची नावे घेतली गेली आहेत. अपहृताने नुकतीच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन एसआयटी चौकशीची मागणी केली. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा वर आले. या निमित्ताने या अपहृताला पाठबळ कुणाचे, यावर राजकीय गोटात चर्चा होऊ लागली आहे. 

परभणीत मंत्र्यांची प्रतिष्ठा पणालालगतच्या परभणी येथेही महानगरपालिकेच्या ६५ जागांसाठी निवडणूक होऊ लागली आहे. तेथे परभणीकडे राज्यमंत्री व पालकमंत्रिपद असूनही भाजप माघारलेला दिसतो आहे. स्थानिक पालकमंत्र्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. तेथे उद्धवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचा अधिक जोर दिसतो आहे. 

मतदान कसे करावे हे कोण सांगणार?सुमारे आठ वर्षांनंतर महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. पहिल्यांदाच चार मते द्यावीच लागणार आहेत. घरोघरी फिरणारे उमेदवार मते मागत आहेत. मात्र, मतदान कसे करावे, याबाबत त्यांच्याकडून जनजागृती होताना दिसत नाही. प्रशासनाचे प्रयत्नही अपुरे पडताना दिसताहेत. त्यामुळे मतदानाच्या वेळी गोंधळ उडण्याचा, खूप वेळ लागण्याचा आणि सायंकाळनंतर सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ruling and Opposition: Will the MahaYuti Experiment Succeed in Nanded?

Web Summary : Nanded's municipal election sees ruling allies contesting against each other, blurring lines. Similar to past successes, it tests voter awareness as the MahaYuti aims for dominance amidst confusion and internal strife.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Nanded Waghala Municipal Corporation Electionनांदेड-वाघाळा महानगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुती