शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

महिन्यात दहा दिवसच पाणी

By admin | Updated: February 12, 2015 13:44 IST

शहरात अवैध नळजोडणींची संख्या वाढत असल्याने कमी दाबाने अल्प वेळेत पाणीपुरवठा होत आहे. दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांना महिन्यात केवळ दहा दिवसच पाणी मिळते.

 नांदेड: शहरात अवैध नळजोडणींची संख्या वाढत असल्याने कमी दाबाने अल्प वेळेत पाणीपुरवठा होत आहे. दोन दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांना महिन्यात केवळ दहा दिवसच पाणी मिळते. असे असले तरी नागरिकांना मात्र महिनाभराची पाणीपट्टी भरावी लागते. अवैध नळजोडणींकडे दुर्लक्ष करणार्‍या मनपाने अधिकृत नळधारकांना मात्र कर भरण्यासाठी कोंडीत पकडले आहे. शहरात सन २0११ मध्ये ३७ हजार नळजोडणी होत्या. २0१२ मध्ये ४५ हजार ५0२ नळजोडणींची संख्या होती. तर मागील वर्षभरात दहा हजारांहून अधिक नळजोडणी वाढल्या. अभय योजनेमुळे दोन वषार्ंपूर्वी अनेक नागरिकांनी नळजोडणींचा लाभ घेतला. दरम्यान, ही योजना बंद करण्यात आली. शहरातील काही भागात अवैध नळजोडणींची संख्या वाढत आहे. तरोडा खु. व बु. भागात अवैध नळजोडणी वाढल्यामुळे येथील नागरिकांना अल्प वेळ पाणी मिळत आहे.मनपाकडून शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठय़ाचे नियोजन तसेच पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी मनपाने हा निर्णय घेतला आहे. परंतु अवैध नळजोडणी रोखण्यास मनपाकडे वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. अधिकृत नळजोडणी घेण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया टाळून एका रात्री रस्त्यावरील मुख्य पाईपलाईनला जोडणी देवून अनेकांनी नळ घेतले आहेत. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. (/प्रतिनिधी)

■ नवीन करानुसार घरगुती नळधारकांना १ हजार ६५0 रूपये प्रतिवर्ष द्यावे लागणार आहेत. यापूर्वी १ हजार ५00 रूपये कर होता. दारिद्रय़ रेषेखाली लाभार्थ्यांसाठी पूर्वी ७५0 तर आता ८२५ रूपये द्यावे लागत आहेत. व्यावसायिक नळधारकांना यापूर्वी ६ हजार ६00 तर आता ८ हजार ४00 रूपये वार्षिक पाणीपट्टी भरावी लागत आहे. धार्मिक स्थळांना प्रतिमहिना ३0 रूपये भरावे लागत आहेत. मालमत्ता कर वाढीनंतर आता पाणीपट्टी करातही वाढ करण्यात आल्यामुळे नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. महिन्याभरातील केवळ दहा दिवसच पाणी मिळत असले तरी पाणीपट्टी मात्र महिनाभराची भरावी लागत आहे.