शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये पाणीबाणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:45 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहरावर पाणीबाणीचे संकट घोंगावत आहे. पण त्याचवेळी लोअर दुधना प्रकल्पातून २० दलघमी पाणी घेतले जाणार आहे. हे पाणी आल्यानंतर संकट टळणार असले तरी ते पाणी वेळेत आणण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.

ठळक मुद्देप्रभारी आयुक्तानंतर महापौरांनीही घेतली आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णूपुरी प्रकल्पात केवळ ६ टक्के जलसाठा शिल्लक असल्याने शहरावर पाणीबाणीचे संकट घोंगावत आहे. पण त्याचवेळी लोअर दुधना प्रकल्पातून २० दलघमी पाणी घेतले जाणार आहे. हे पाणी आल्यानंतर संकट टळणार असले तरी ते पाणी वेळेत आणण्याची कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ५.२० दलघमी पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा १५ मेपर्यंत पुरेल इतका आहे. त्याचवेळी लोअर दुधना प्रकल्पातून १० ते १५ मे या कालावधीत २० दलघमी पाणी घेतले जाणार आहे. त्यामुळे शहरापुढे पाणी संकट दिसत असले तरी त्यावरील तोडगाही उपलब्ध आहे. मात्र या सर्व बाबी नियोजनाप्रमाणे पूर्ण झाल्या तर नांदेडकरांना पाणी उपलब्ध होणार आहे. त्याचवेळी विष्णूपुरी प्रकल्पात ३ दलघमी मृतसाठा उपलब्ध असतो. या पाण्यावरही शहराची तहान भागू शकते. मात्र मृतसाठा उचलण्यापर्यंतची वेळ येणार नाही असे महापौर शीलाताई भवरे यांनी सांगितले. गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत पाणी उपलब्धतेची माहिती घेण्यात आली. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी सांगितले की, शहरासाठी डिग्रस बंधाºयातून २० दलघमी पाणी घेण्यात आले होते. त्यातील १० दलघमी पाणी सिंचन पाळ्यासाठी सोडण्यात आले. त्यानंतर सिद्धेश्वर मधूनही १० दलघमी पाणी घेतले. त्यापैकी ३ दलघमी पाणी विष्णूपुरीत पोहोचले. आता २० दलघमी पाणी १५ मेपर्यंत उपलब्ध होईल. पर्यायी पाणीपुरवठा योजनेसाठी इसापूर धरणातील १० दलघमी पाणी राखीव आहे. त्यापैकी अडीच दलघमी पाणी आसनात घेतले आहे. अडीच दलघमी पाणी घेण्यासाठी चर्चा सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होणार नाही.महापौर शीलाताई भवरे यांनी घेतलेल्या बैठकीत अमृत योजनेचा आढावा घेण्यात आला. शहरात अमृत योजनेतून १३२ किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकली जाणार आहे. आतापर्यंत ६८.५१ किमी जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. अमृत योजनेअंतर्गत शहरवासियांना पाणी लवकर देण्याचे निर्देशही यावेळी महापौरांनी दिले. यावेळी उपमहापौर विनय गिरडे, नगरसेवक दुष्यंत सोनाळे, किशोर भवरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास विरोधशहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र त्याला महापौर शीलाताई भवरे यांनी विरोध करत १७ मेपासून सुरु होणाºया रमजान महिन्याच्या पार्श्वभूमिवर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणे उचित ठरणार नाही. सध्याच्या वेळापत्रकानुसार पाणी सोडावे, असे निर्देशही महापौरांनी दिले. शहरात नऊ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. शहरात ७५४ हातपंप आहेत. तर १९३ पावरपंप आहेत. या पंपांचे सर्वेक्षण करुन ते दुरुस्त केले जाणार आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्तNandedनांदेडWaterपाणी