वाळकेवाडी शिवारात बिबट्याने पाडला गायीचा फडशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:16 IST2020-12-29T04:16:07+5:302020-12-29T04:16:07+5:30

हिमायतनगर : तालुक्यातील वाळकेवाडी शिवारात पुन्हा एकदा बिबट्याने गायीचा फडशा पाडल्याची घटना २६ रोजी रात्री घडली. आठ दिवसांपूर्वी ...

In Walkewadi Shivara, a cow was killed by a leopard | वाळकेवाडी शिवारात बिबट्याने पाडला गायीचा फडशा

वाळकेवाडी शिवारात बिबट्याने पाडला गायीचा फडशा

हिमायतनगर : तालुक्यातील वाळकेवाडी शिवारात पुन्हा एकदा बिबट्याने गायीचा फडशा पाडल्याची घटना २६ रोजी रात्री घडली. आठ दिवसांपूर्वी अशीच घटना घडली होती.

माजी सरपंच दिलीप धुमाळे यांचे शेत सर्व्हे नं. १४० मधील आखाड्यावर गुरे- ढोरे बांधून होते. त्यातील एका गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. दोन फर्लांग फरपटत ओढत नेऊन गायीचे अर्ध अंग खाऊन टाकले होते. यासंदर्भात दिलीप धुमाळे यांच्याशी विचारणा केली असता २६ च्या राेजी सालगडी व आम्ही सर्व शेतातील कामे आटपून सायंकाळी घरी परतलो. पुन्हा जागलीवर झोपायला कुणी गेले नाही. सकाळी दूध काढण्यासाठी शेतात गेलो असता आखाड्यावर एक गाय दिसली नसल्याने शोध घेतला असता, बिबट्याने मारून अर्धवट खाल्ल्याचे निदर्शनास आले. शेतकऱ्याचे ४० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी संध्या डोके यांच्या मार्गदर्शनाखाली २७ रोजी वनरक्षक, सुरेश घोगरे, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला. घटनास्थळी बिबट्याच्या पंजाचे ठसे दिसून आले.

Web Title: In Walkewadi Shivara, a cow was killed by a leopard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.