व्हीव्ही ' पॅट' च्या पहिल्या घासालाच खडा; ३७ पैकी १२ ठिकाणी जुन्याच पद्धतीने मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 16:46 IST2017-10-11T16:45:56+5:302017-10-11T16:46:18+5:30
नांदेड - वाघाळा मनपा निवडणुकीच्या माध्यमातून यंदा प्रथमच व्हीव्ही पॅट यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. मात्र प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या या प्रयोगादरम्यान यंत्रणेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला.

व्हीव्ही ' पॅट' च्या पहिल्या घासालाच खडा; ३७ पैकी १२ ठिकाणी जुन्याच पद्धतीने मतदान
नांदेड : नांदेड - वाघाळा मनपा निवडणुकीच्या माध्यमातून यंदा प्रथमच व्हीव्ही पॅट यंत्रणेचा वापर करण्यात येत आहे. मात्र प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत असलेल्या या प्रयोगादरम्यान यंत्रणेला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. मतदान यंत्र आणि व्हीव्ही पॅट यंत्रना यांत ऐनवेळी कनेक्टीव्हिटी न झाल्याने नियोजन केलेल्या ३७ पैकी तब्बल १२ ठिकाणी व्हीव्ही पॅट विनाच मतदान घेण्याची नामुष्की यंत्रणेवर ओढवली.
केलेले मतदान बटन दाबलेल्या उमेदवाराऐवजी दुसऱ्याच उमेदवाराला जाते. अशा तक्रारी मागील काही निवडणूकात सातत्याने येत असल्याने निवडणूक विभागाने नांदेड मनपा निवडणूक मतदानावेळी प्रायोगिक तत्वावर व्हीव्ही पॅट ( व्होटर्स व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल) ही यंत्रणा वापरण्याचा निर्णय घेतला. प्रारंभी सर्व ८१ वॉर्ड मध्ये ही यंत्रणा वापरण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र मशिनची अपुरी उपलब्धता तसेच प्रशिक्षणासाठी पुरेसा वेळ न मिळाल्याने एकाच प्रभागात या यंत्रणेचा वापर करण्याचे निश्चित करण्यात आले. या यंत्रणेमुळे मतदारांना त्यांनी केलेले मतदान त्याच उमेदवार गेले का हे दिसणार आहे. या नुसार तरोडा परिसरातील प्रभाग क्र २ मध्ये हा उपक्रम राबविण्याचे निश्चित करण्यात आले. ३७ ठिकाणी व्हीव्ही पॅट मशिन बसविण्यात आल्या. मात्र मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर यातील १२ मशिनला कनेक्टिव्हीटी मिळू शकली नाही. या प्रकारामुळे काहीकाळ मतदानही थांबविण्यात आले. मात्र यंत्रना सुरू न झाल्याने शेवटी १२ ठिकाणी व्हीव्ही पॅट विनाच मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.