शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी विजेंद्रला, बोहल्यावर चढला जयेंद्र !; देगलूरच्या कुटुंबाने तरुणीची केली फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 19:20 IST

जयेंद्र आणि विजेंद्र हा एकच व्यक्ती असल्याचे भासवून विवाहितेची फसवणूक

नांदेड : लग्नात स्थळ दाखविताना लहान भावाच्या नोकरीचे कागदपत्रे दाखवून प्रत्यक्षात बोहल्यावर मात्र मोठा भाऊ चढला़ जयेंद्र आणि विजेंद्र हा एकच व्यक्ती असल्याचे भासवून विवाहितेची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी देगलूरच्या सात जणांविरुद्ध अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 

तेजश्री (नाव बदलले) या अहमदपूर येथील तरुणीसाठी देगलूर येथील जयेंद्र बाबूराव जाधव यांचे स्थळ आले होते़ त्यावेळी जाधव कुटुंबियांनी तेजश्रीच्या कुटुंबियांना जयेंद्र आणि विजेंद्र अशी एकाच वराची दोन नावे असल्याचे सांगत त्यांना विजेंद्रची शैक्षणिक कागदपत्रे दाखविली होती. वास्तविक जयेंद्रचे शिक्षण जेमतेम असून विजेंद्र हा पुण्यात नोकरीला आहे़ परंतु, जयेंद्र आणि विजेंद्र हे दोघेही एकच असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी भासविले. तेजश्री आणि जयेंद्रचे १० डिसेंबर २०१८ रोजी लग्न झाले़ परंतु, लग्नाच्या एक महिन्यानंतरच जयेंद्रच्या कुटुंबियांनी तेजश्रीला त्रास देण्यास सुरुवात केली़ माहेराहून २५ लाख रुपये घेवून येण्याची मागणी करण्यात येत होती़ 

लग्नानंतर आले सत्य समोर

दरम्यान, लग्नानंतर जयेंद्र आणि विजेंद्र या एक व्यक्ती नसून दोन वेगवेगळ्या व्यक्ती असल्याची बाब तेजश्रीच्या कुटुंबियांना समजली़ त्यावेळी तेजश्रीच्या माहेरच्यांना तर धक्काच बसला़ याबाबत त्यांनी जाधव कुटुंबियांकडे विचारणा केली असता, तेजश्रीला घरातून हाकलून लावण्यात आले़ 

सर्व आरोपी फरार

याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन अहमदपूर पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपावरुन जयेंद्र जाधव, राजश्री जाधव, बाबूराव जाधव, संजीवनी जाधव, विठ्ठल जाधव, विजेंद्र जाधव व चरण जाधव यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला होता. दरम्यान, या प्रकरणात विवाहितेची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात पुढे आले असून या गुन्ह्यात फसवणुकीचे कलम वाढविण्याबाबत अहमदपूर पोलिसांनी न्यायालयात पत्र दिले आहे़ या प्रकरणातील सर्व आरोपी मात्र फरार  आहेत़ 

टॅग्स :marriageलग्नfraudधोकेबाजीPoliceपोलिसFamilyपरिवार