शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Video: छगन भुजबळांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न; काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 12:03 IST

छगन भुजबळ यांची हिंगोली येथील सभा उधळून लावण्याचा इशाराही मराठा आंदोलकांकडून देण्यात आला आहे

शिवराज बीचेवार 

नांदेड - राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मराठा आणि ओबीसी नेतेमंडळीत शाब्दीक हल्लाबोल होताना दिसून येत आहे. उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याकडून मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं जातय. तर, भुजबळ हेही जरांगे पाटलांवर थेट प्रहार करताना दिसून येतात. दरम्यान, भुजबळ यांच्या नेतृत्त्वात जालन्यातील अंबड येथे ओबीसींचा महाएल्गार मेळावा पार पडला होता. आता, अंबडनंतर हिंगोली जिल्ह्यात ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, छगन भुजबळ यांची हिंगोली येथील सभा उधळून लावण्याचा इशाराही मराठा आंदोलकांकडून देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भुजबळ यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.  

ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे हिंगोली येथील महा एल्गार मेळाव्याला जाण्यासाठी नांदेड विमानतळ येथून बाहेर पडल्यावर मराठा आंदोलनकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी, आंदोलकांकडून त्यांना काळे झेंडेही दाखविण्यात आले. याप्रकरणी, पोलिसांनी लगेच चार जणांना ताब्यात घेतले. स्वराज्य संघटनेने हिंगोली येथील ओबीसींचा एल्गार मेळावा उधळून टाकण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पोलिसांनी सकाळ पासूनच विमानतळ रस्त्यावर मोठा बंदोबस्त वाढविला होता. तर, स्वराज्य संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी अगोदरच ताब्यातही घेतले होते.

दरम्यान, स्वराज्य पक्षाचे राज्य उपाध्यक्ष माधव देवसरकर व त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांना नांदेड ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळMaratha Reservationमराठा आरक्षणNandedनांदेडHingoliहिंगोली