शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

नांदेड जिल्ह्यातील २० गावांत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:26 IST

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मान्सनपूर्व तयारीला लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कुठल्याही आजाराची साथ पसरु नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील २० गावांत ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यही राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व्ही. आर. झिने यांनी सांगितले.

ठळक मुद्देअतिसार नियंत्रणावरही भर : आरोग्य विभागाकडून मान्सूनपूर्व तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग मान्सनपूर्व तयारीला लागला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कुठल्याही आजाराची साथ पसरु नये, यासाठीच्या उपाययोजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील २० गावांत ग्रामस्वराज्य अभियानातंर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्यही राबविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी व्ही. आर. झिने यांनी सांगितले.दरवर्षी पावसाळ्यात जलजन्य, कीटकजन्य आजारांची साथ उद्भवते. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने मान्सनपूर्व तयारी हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून २८ ते ९ मे या कालावधीत जिल्ह्यात अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ० ते ५ वर्षे या वयोगटातील बालकांच्या घरोघरी जाऊन ओआरएस पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांसह मातांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी विविध शाळांमध्येही प्रात्यक्षिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. डायरियाच्या अनुषंगानेही विशेष दक्षता घेण्यात येत असून मोहिमेमध्ये डायरियाचा रुग्ण आढळल्यास वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.याबरोबरच २१ ते २४ मे या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत अतिविशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान राबविण्यात येणार आहे.यासाठी केंद्र शासनाने जिल्ह्यातील १० तालुक्यांतील २० गावांची निवड केली आहे. या गावांमध्ये एप्रिल महिन्यात अभियानाची पहिली फेरी राबविण्यात आली असून आता २१ मे पासून दुसºया फेरीला प्रारंभ होत आहे. या अभियानांतर्गत गरोदरमाता आणि ० ते २ वर्षे या वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार असल्याचेही जिल्हा बालआरोग्य अधिकारी झिने यांनी सांगितले.दरम्यान, दरवर्षी जिल्ह्यात पावसाळ्याच्या काळात जलजन्य, कीटकजन्य आजारामुळे साथीचे रोग पसरतात़ नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाणीपुरवठ्यामुळे पावसाळ्याच्या काळात रुग्णसंख्येत मोठी वाढ होते़ त्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीला वेग आला आहे़साथरोग नियंत्रणासाठी मनपाचा विशेष कक्षमान्सूनपूर्व उपाययोजनांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने जंगमवाडी येथील दवाखान्यात साथरोग नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. याबरोबरच नांदेड शहराचे १५ झोन तयार करुन झोननिहाय वैद्यकीय अधिकाºयांच्या नेमणुका केल्या आहेत. साथरोग नियंत्रणासाठी मनपाच्या सर्व दवाखान्यांत प्रथमोपचाराची व्यवस्था करण्यात आली असून योग्य त्या संदर्भसेवा या दवाखान्यात नागरिकांना मिळणार आहेत. अतिसंवेदनशील व झोपडपट्टी परिसरात मनपाच्या आरोग्य विभागामार्फत रक्तनमुने तपासणी तसेच औषधोपचारही करण्यात येणार असल्याचे मनपाच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया आदी आजार डासांमार्फत तर गॅस्ट्रो, कॉलरा, विषमज्वर, अतिसार या पाण्यामार्फत पसरणाºया आजारांची वाढ होऊ नये यासाठी कर्मचाºयांना दक्ष राहण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. अतिसार नियंत्रण पंधरवडा आणि मिशन इंद्रधनुष्य हे मान्सूनपूर्व तयारी म्हणून राबविण्यात येत आहे. मलेरियाचाच रुग्ण आढळल्यास मलेरिया विभागाच्या वतीने संबंधित ठिकाणी फॉगिंगही करण्यात येणार आहे.-व्ही.आर.झिने, जिल्हा प्रजनन व बालआरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नांदेड.

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदHealthआरोग्यRainपाऊस