लस घेणे ही लोकचळवळ बनेल : निसार तांबोळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:18 IST2021-04-09T04:18:20+5:302021-04-09T04:18:20+5:30
सदर अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रास्ताविक डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले. नांदेड शहरात कोरोनाचा प्रसार वाढला ...

लस घेणे ही लोकचळवळ बनेल : निसार तांबोळी
सदर अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रास्ताविक डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी केले. नांदेड शहरात कोरोनाचा प्रसार वाढला आहे. त्यामुळे जनतेनी लस घेणे गरजेचे आहे. संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्याचा एकमेव शास्त्रीय मार्ग लस हाच आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत याबद्दल जागृती व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
निसार तांबोळी म्हणाले, नागरी कृती समितीच्या लसीकरण जनजागृती अभियानामुळे शहरातील नागरिकांत जागृती निर्माण होईल. या अभियानामुळे नागरिकांनी लस घेणे ही लोक चळवळ बनेल व कोरोनापासून आपण सुरक्षित राहू, असा विश्वास व्यक्त केला. नागरी कृती समितीच्या वतीने लसीकरणाची जनजागृती करणाऱ्या चित्ररथाचे उद्घाटन तांबोळी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले.
अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाण मास्कचा वापर करा, गर्दी टाळा, ६ फूट सामाजिक अंतर ठेवा, हात व तोंड साबणाने धूत चला, असे संदेश ध्वनिक्षेपणाद्वारे देण्यात आले.
ध्वनिक्षेणाद्वारे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. व्यंकटेश काब्दे, छातीविकार तज्ज्ञ डॉ. मृत्युंजय महिंद्रकर, मधुमेह थायराईड तज्ज्ञ डॉ. आदिती काब्दे, मुत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुनील मसारे, मेंदुविकार तज्ज्ञ डॉ. पंकज राठी, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्मिता भट्टड व डॉ. भारत तोष्णिवाल यांनी कोरोनाची लक्षणे, घ्यावयाची खबरदारी व उपायांची उपयुक्तता यावर माहिती दिली. माजी खा. काब्दे यांच्या संकल्पनेला कृतीत रूपांतर करण्याचे काम विजय होकर्णे यांनी केले. यशस्वीतेसाठी समितीचे समन्वयक डॉ. लक्ष्मण शिंदे, परिवर्तन प्रतिष्ठानचे डॉ. किरण चिद्रावार, डॉ. अशोक सिध्देवाड, डॉ. कुंजम्मा काब्दे, प्रा. डॉ. स्मीता भट्टड, डॉ. भट्टड, प्रा. के. एस. धुतमल, प्राचार्य डी. यू. गवई, प्रा. डॉ. अनिरुद्ध बनसोडे, प्रा. डॉ. बोरीकर, श्री. बालाजी टीमकीकर इत्यादींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी, तर आभार डॉ. स्मिता भट्टड यांनी मानले.