माणसांचे लसीकरण लांबले, जनावरांच्या लसींची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:18 IST2021-05-18T04:18:51+5:302021-05-18T04:18:51+5:30
जिल्ह्यातील जनावरांची आकडेवारी शेळ्या- १ लाख ४९ हजार मेंढ्या- ५१ हजार बैल- २ लाख गायी- ३ लाख म्हशी- २ ...

माणसांचे लसीकरण लांबले, जनावरांच्या लसींची प्रतीक्षा
जिल्ह्यातील जनावरांची आकडेवारी
शेळ्या- १ लाख ४९ हजार
मेंढ्या- ५१ हजार
बैल- २ लाख
गायी- ३ लाख
म्हशी- २ लाख
पशुसंवर्धन अधिकाऱ्याचा कोट-------------
लाळ्या, खुरकुतचे लसीकरण जिल्ह्यात जवळपास पूर्ण झाले आहे. आता मान्सूनपूर्व घटसर्प, फऱ्या तसेच आंत्रविषारसाठी लसीकरण करायचे आहे. पशुसंवर्धन विभागाच्या बैठका घेऊन यासाठीचे नियोजन पूर्ण केले आहे. येणाऱ्या आठवडाभरात ही लस उपलब्ध होताच लसीकरणाला सुरुवात केली जाईल.
भूपेंद्र बोधनकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नांदेड.
कोणकोणत्या दिल्या जातात लसी
गायी-म्हशींना घटसर्प, फऱ्या, लाळ्या, खुरकुत या आजारासाठी ठरवून दिलेल्या महिन्यात लस दिली जाते. तर फाशी, काळपुळी, आंत्रविषार, देवी, फऱ्या आदी आजारासाठी शेळ्या-मेंढ्यांचे लसीकरण केले जाते. लसीकरण हे निरोगी जनावरांतच करावे लागते. तसेच दिवसातील थंड वेळेत लसीकरण केले जाते. लसीच्या बॅच क्रमांकाची नोंद पशुसंवर्धन विभागातर्फे ठेवली जाते. शक्यतो एकाच दिवशी एका गावातील लसीकरण पूर्ण केले जाते.
चौकट------------
शीघ्र कृती दलाची स्थापना
पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची मान्सनपूर्व लसीकरणासाठी बैठक घेऊन नियोजन केले आहे. पावसाळ्यात पशुधनाचे नुकसान झाल्यास याबाबतची माहिती तातडीने पशुसंवर्धन विकास अधिकाऱ्याकडे देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. लसीकरणासाठी जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे.
प्रतिक्रिया
मान्सूनपूर्व घटसर्प, फऱ्या आजाराची लस जनावरांना देणे आवश्यक आहे. या लसीकरणाची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत. कोरोनाकाळामुळे लसीकरणाला यंदा उशीर लागतो की काय? अशी चिंता सतावत आहे.
-कामाजी पुरभाजी कदम
पशुसंवर्धन विभागातर्फे दरवर्षी लसीकरण केले जाते. लसीकरणामुळे जनावरांतील रोग प्रतिकारशक्ती वाढते. यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे लसीकरणाला विलंब होण्याची भीती वाटत आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढेल.
-सुभाष माणिकराव कदम