शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

आघाडीची एकजुट सत्तापरिवर्तन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:36 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने लढा दिल्यास या निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सेना-भाजपाला धडा शिकविण्याची संधी निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देगोरठा येथे मोठा प्रतिसाद काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी संयुक्त सभेत व्यक्त केला विश्वास

नांदेड : काँग्रेस-राष्ट्रवादीसह आघाडीतील सर्व घटक पक्षांनी एकजुटीने लढा दिल्यास या निवडणुकीत आघाडीचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करीत सर्व पातळ्यांवर अपयशी ठरलेल्या सेना-भाजपाला धडा शिकविण्याची संधी निवडणुकीच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे देशात सत्तापरिवर्तन करण्यासाठी आघाडीतील सर्वांनी एकजुटीने कामाला लागण्याचा निर्धार बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्यक्त केला.उमरी तालुक्यातील गोरठा येथे काँग्रेस-राष्ट्रवादीसह रिपाइं (गवई गट), शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदी मित्रपक्षांची संयुक्त सभा काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ पार पडली. या सभेला खा. चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर, माजी मंत्री गंगाधर कुंटूरकर, माजी मंत्री कमलकिशोर कदम, आ. अमरनाथ राजूरकर, माजी खा. तुकाराम रेंगे पाटील, माजी आ. शंकरअण्णा धोंडगे, हरिहरराव भोसीकर, अप्पाराव सोमठाणकर, राजेश कुंटूरकर, संजय लहानकर, शिरीष देशमुख गोरठेकर, संगीता जाधव, डॉ. सुनील कदम, जगन शेळके, सदाशिव पोपुलवाड आदींसह पदाधिकाऱ्यांची मंचावर उपस्थिती होती. खा. अशोकराव चव्हाण म्हणाले की, कै. शंकरराव चव्हाण, पद्मश्री श्यामराव कदम, बाबासाहेब गोरठेकर, बन्नाळीकर यांनी नांदेड जिल्ह्यात समन्वयाने राजकारण केल्याचा इतिहास आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी हे वैचारिक मित्र आहेत. देशातील लोकशाही व्यवस्था टिकविण्याची मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. त्यामुळे ही मजबूत आघाडी देशात निश्चितपणे सत्तापरिवर्तन घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावपातळीवरील कार्यकर्ते आमचे काय? असा प्रश्न करीत आहेत. या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी निवडणुकांत आघाडीतील पक्षांनी एकजुटीने कामाला लागायला हवे, असे ते म्हणाले. जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला ३० तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागा मिळाल्या. काँग्रेसला स्वबळावर जिल्हा परिषदेत सत्तेत येता आले असते. परंतु माझी नेहमीप्रमाणेच सामंजस्याची भूमिका होती. त्यामुळेच काँग्रेस ३ व राष्ट्रवादी ३ अशी पदांची विभागणी केल्याचे सांगत, काही ठिकाणी वैचारिक मतभेद होऊ शकतात. परंतु माझे कोणाशीही वैयक्तिक मतभेद नाहीत, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. नव्या पिढीमध्ये विसंवाद नव्हे तर सुसंवाद असला पाहिजे, अशीच आपली भूमिका असल्याचे सांगत पाणीप्रश्न जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा आहे. पाणी नंतर मिळणार नाही. त्यामुळे पाण्याचा हा लढा आपण आत्ताच लढला पाहिजे अन्यथा उमरी, धर्माबाद तालुक्याचे वाळवंट होईल, असा इशाराही खा. चव्हाण यांनी दिला. कमलबाबूंना एमएलसी करण्यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेवून निवडून आणले. ही माणसे व कार्यकर्ते आज सांभाळायला हवीत, असे उद्गारही त्यांनी काढले.यावेळी बापूसाहेब गोरठेकर, गंगाधरराव कुंटूरकर, कमलकिशोर कदम, शंकरअण्णा धोंडगे यांचीही भाषणे झाली. राजस्थान, मध्यप्रदेश व छत्तीसगढमध्ये नुकताच काँग्रेसने भाजपाचा सफाया केला, त्याच निकालाची महाराष्ट्रात पुनरावृत्ती करु, असा विश्वास कुंटूरकर यांनी व्यक्त केला.राष्ट्रवादी आघाडी धर्म पाळणार-गोरठेकरकाँग्रेस-राष्ट्रवादी सर्व जाती-धर्माच्या लोकांना सोबत घेवून चालले आहेत. राजकारणात आजवर मी कधी कुठला शब्द दिला नाही. परंतु आघाडी धर्म पाळण्याचा शब्द मी आमचे नेते शरद पवार यांना दिला आहे आणि तो मी पाळणारच असल्याचे सांगत आमच्या रक्तात गद्दारी नसल्याचे उद्गार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी काढले. अशोकराव चव्हाण यांचा विजय निश्चित आहे. तुम्हाला निवडून आणणे आमचे कर्तव्य असल्याचे सांगत प्रचारासाठी मी स्वत: फिरत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा