शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

युपीपी पाण्याबाबत नांदेडवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 00:50 IST

उर्ध्व पैनगंगेचे पाणी कै. शंकरराव चव्हाण यांनी महत्प्रयासाने नांदेडसाठी आणले. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली होती.

ठळक मुद्देछगन भुजबळ गोदावरीचे पाणी भाजपा सरकारनेच गुजरातला वळविले

नांदेड : उर्ध्व पैनगंगेचे पाणी कै. शंकरराव चव्हाण यांनी महत्प्रयासाने नांदेडसाठी आणले. त्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली होती. मात्र हे पाणी वरच्या भागात नेवून नांदेडकरांवर भाजपा सरकारने अन्याय केल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली. गोदावरीच्या पाण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस धादांत खोटे बोलत असून गुजरातचा पुळका असल्याने त्यांनीच हे पाणी तिकडे वळविल्याचा आरोपही त्यांनी केला.खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ भोकर येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. मंचावर माजी मंत्री विजय वडेट्टीवार, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, किशोर गजभिये यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शिवसेना-भाजपावर चौफेर हल्ला चढविला. २०१० मध्ये काँग्रेस आघाडी सरकारने हे पाणी गुजरातला देण्याबाबत कसलाही निर्णय घेतलेला नाही. मात्र त्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये येवून गोदावरीच्या पाण्याबाबत धादांत खोटे विधान केले. गुजरातचा पुळका कोणाला आहे हे सर्वसामान्यांना कळते. उलट भाजप सरकारच नांदेडकरांचे पाणी पळवून या जिल्ह्याची कोंडी करु पाहत आहे. भाजपाचे हे मनसुबे पूर्ण होणार नाहीत, याची खबरदारी मतदारांनीही घ्यायला हवी, असे सांगत काँग्रेसची सत्ता आल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येईल, असा शब्द भुजबळ यांनी दिला.मनसेच्या राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बनवेगिरी नांदेडमध्ये पुराव्यासह उघड केली. त्यावर काहीही संबंध नसताना अशोकराव चव्हाण यांनीच राज ठाकरे यांना किरायाने सभेसाठी आणल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज ठाकरे यांना काँग्रेसने किरायाने आणले म्हणता मग चार-पाच पक्ष बदललेल्या आणि शिवसेनेचे आमदार असलेल्या चिखलीकरांना भाजपाने कोणत्या भाडेतत्त्वावर उमेदवारी दिली? हेही मुख्यमंत्र्यांनी सांगायला हवे होते, अशी बोचरी टीकाही भुजबळ यांनी केली.देशातला मतदार हा चौकीदार नव्हे,तर तो या देशाचा मालक आहे. विजय मल्ल्या, निरव मोदी आणि मेहुल चोकसीसारखे व्यापारी सर्वसामान्यांचे हजारो कोटी रुपये बुडवून पळवून गेले तेव्हा स्वत:ला चौकीदार म्हणणारे देशाचे पंतप्रधान झोपले होते का? अशी टीका करीत महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आणि सर्वसामान्य शेतकरी चारा छावण्याची मागणी करीत असताना हे सेना-भाजप सरकार डान्सबार आणि लावण्या देत असल्याची टीकाही त्यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानात बदल करण्याचे मनसुबे भाजपा सरकारचे असून ते उधळून लावा, असे आवाहनही भुजबळ यांनी केले. प्रारंभी मारोतराव पवळे यांनी प्रास्ताविक तर दिगंबर गायकवाड यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.दारुवाला हवा की पाणीवाला ?कै. शंकरराव चव्हाण यांच्या काळापासूनच नांदेड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळाली. त्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी नांदेडसाठी खेचून आणला. त्यामुळेच नांदेडचा चेहरामोहरा बदलला. विकासाची ही प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी अशोकराव चव्हाण यांच्या पाठीशी रहा, असे आवाहन आ.अमरनाथ राजूरकर यांनी केले. जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रासाठी अशोकरावांनी मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे मतदार दारुवाल्याच्या नव्हे, तर पाणीवाल्याच्या पाठीशी राहतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी भक्कम- चव्हाणमागील पाच वर्षांत सर्वच आघाड्यांवर शिवसेना-भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. या नाकर्त्या सरकारला सत्तेबाहेर खेचण्याचा विडा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने उचलला आहे. ही आघाडी भक्कमपणे काम करीत असल्याचे खा.अशोकराव चव्हाण यांनी सांगितले. गोरठा येथे झालेल्या संयुक्त सभेपासून बापूसाहेब गोरठेकर तसेच गंगाधरराव कुंटूरकर आघाडीचा धर्म पाळून पूर्ण ताकदीने काँग्रेस प्रचारार्थ झटत आहेत. मात्र युतीचा उमेदवार कुंटूर व गोरठ्याच्या वाड्यावर जावून आल्याचे सोशल मीडियावर फोटो टाकून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्ह्यातील जनता चाणाक्ष आहे. विरोधकांच्या अशा खेळींना ते बळी पडणार नाहीत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सद्य:स्थितीत जिल्ह्याच्या दृष्टीने पाण्याचा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. युपीपी व बाभळीच्या पाण्यासाठी जिल्ह्यातील सर्वांनीच एकत्रित येण्याची गरज आहे. उमरी भागातील शेतकऱ्यांनी युपीपीच्या पाण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन करीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस सक्षम आहे. त्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना मतदारांनी बळी पडू नये, असे आवाहनही चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडChhagan Bhujbalछगन भुजबळcongressकाँग्रेस