विरोधकांवर एकतर्फी मात : अशोकराव चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:16 IST2021-04-05T04:16:24+5:302021-04-05T04:16:24+5:30

समर्थ सहकार पॅनलला विजयी करणाऱ्या जिल्हा बँकेच्या सर्व सभासदांचेही मी आभार मानतो. जिल्हा बँकेच्या मतदारांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास ...

Unilateral defeat of opponents: Ashokrao Chavan | विरोधकांवर एकतर्फी मात : अशोकराव चव्हाण

विरोधकांवर एकतर्फी मात : अशोकराव चव्हाण

समर्थ सहकार पॅनलला विजयी करणाऱ्या जिल्हा बँकेच्या सर्व सभासदांचेही मी आभार मानतो. जिल्हा बँकेच्या मतदारांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या या बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची मला खात्री आहे. जिल्हा बँकेची परिस्थिती आज काय आहे, ते लपून राहिलेले नाही. मागील काही वर्षांत एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे. ही बँक वाचविण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचे अनुदानही मिळवून दिले, पण बँकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून, महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील, याचा मला विश्वास आहे.

सोबतच मला सर्व उमेदवार व या विजयाच्या शिलेदारांना विनंती करायची आहे की, सध्याची कोरोनाची परिस्थिती व ज्येष्ठ नेते गंगाधरराव देशमुख-कुंटूरकर यांचे झालेले निधन लक्षात घेता कोणताही जल्लोष करू नये. पुनश्च सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार.

Web Title: Unilateral defeat of opponents: Ashokrao Chavan