शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

अवजड वाहतुकीचा बळी! घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरु असताना पित्याचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 12:03 IST

अर्धापूरात जड वाहतूकीने घेतला बळी; मुलीचे लग्न महिनाभरावर आलेले असताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

- गोविंद टेकाळेअर्धापूर ( जि. नांदेड ) :नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. घरात मुलीच्या लग्नाची लगबग सुरू असताना वधूपित्याचा अपघातीमृत्यू  झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी ( दि.२८) मार्च रोजी घडली. मुलीचे लग्न महिनाभरावर आलेले असताना घरातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वाघजी सखाराम लिंगायत (४५ वर्षे रा.चोरंबा ता.अर्धापूर) हे अर्धापूर शहरातील व्यंकटराव साखरे यांच्याकडे सालगडी म्हणून काम करतात. वाघजी मंगळवारी सायंकाळी ८ वाजता दैनंदिन वस्तू खरेदीसाठी सायकलवर शहरात जात असतांना अर्धापूर शहरातील कृषी कार्यालयासमोर पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी महामार्ग, अर्धापूर पोलीस यांनी धाव घेतली व मयतांचे पार्थिव पुढील सोपस्कारासाठी ग्रामीण रुग्णालय अर्धापूर येथे पाठविण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. 

पुढील महिन्यात होते मुलीचे लग्नवाघजी लिंगायत यांची मुलगी नेहाचा नुकताच साखरपुडा  झालेला आहे. पुढील महिन्यात तिच्या लग्नाची तारीख काढणार होते. दरम्यान, घरात नेहाच्या लग्नाची तयारी सुरु झाली होती. अशी लगबग सुरू असताना वधुपित्याचे अपघातात दुर्दैवी निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जड वाहनास प्रवेश बंदचा रोजच उडतो फज्जाशहरात अवजड वाहनास प्रवेश बंद आहे. परंतु बंदी झुगारून रोज अनेक वाहने शहरात येतात. त्याचा सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यातूनच अशा अपघाताच्या घटना घडत असल्याचा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे.

गुत्तेदारांचा हलगर्जीपणा वाटेल तिथे खोदकामरस्त्याचे काम सुरू असून गुत्तेदार वाटेल तिथे खोदकाम करून वाहतुकीस व वाहन चालकांना अडथळा निर्माण करत आहेत. रस्ता उखडून ठेवल्याने धुळ व चुरीमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यातच अनेक गाड्या घसरून पडत आहेत. संबंधितांनी लक्ष देऊन वाहतुकीस अडथळे येणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून होत.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNandedनांदेड