पोहण्यासाठी गेलेले दोन युवक झरी तलावात बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 14:32 IST2021-05-17T14:32:32+5:302021-05-17T14:32:48+5:30
नांदेड शहरातील नई आबादी भागात राहणारे काही तरुण रविवारी सकाळी पोहण्यासाठी शहरानजीक असलेल्या झरी येथे पोहोचले.

पोहण्यासाठी गेलेले दोन युवक झरी तलावात बुडाले
नांदेड : शहरानजीक असलेल्या झरी येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला असून, यातील एका तरुणाचा मृतदेह सापडला असून, दुसऱ्या बुडालेल्या तरुणाचा शोध घेतला जात आहे.
नांदेड शहरातील नई आबादी भागात राहणारे काही तरुण रविवारी सकाळी पोहण्यासाठी शहरानजीक असलेल्या झरी येथे पोहोचले. येथील तलावात ते पोहत असताना नई आबादी भागातील शेख माजिद शेख मकदूम (वय २२) आणि शेख मुशर्रफ शेख इब्राहीम (१७) हे दोघेजण बुडाले. हे कळताच सोबत आलेल्या इतर तरुणांनी आरडाओरडा सुरू केला. स्थानिक नागरिकांनी शोध घेतला असता शेख माजिदचा मृतदेह आढळून आला. तो मृतदेह शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. मात्र, बुडालेल्या शेख मुशर्रफ याचा शोध घेतला जात होता.
नांदेड ग्रामीण पोलीसही घटनास्थळी पोहोचले होते. शेख मुशर्रफचा शोध घेण्यासाठी मनपा अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले होते. मनपा अग्निशमन दलाकडून बुडालेल्या एका तरुणाचा शोध घेतला जात असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी सांगितले.