महावीर चौक भागातून दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:23 IST2021-08-24T04:23:07+5:302021-08-24T04:23:07+5:30

प्लॉटच्या वादातून जबर मारहाण नांदेड : प्लॉटवर आल्याच्या कारणावरून एका चालकाला मारहाण करण्यात आली. ही घटना १९ ऑगस्ट रोजी ...

Two-wheeler lampas from Mahavir Chowk area | महावीर चौक भागातून दुचाकी लंपास

महावीर चौक भागातून दुचाकी लंपास

प्लॉटच्या वादातून जबर मारहाण

नांदेड : प्लॉटवर आल्याच्या कारणावरून एका चालकाला मारहाण करण्यात आली. ही घटना १९ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात चार जणांवर गुन्हा नोंद झाला. रवी नागनाथ गोपीवार हे गोकूळनगर भागात प्लॉटवर गेले असताना रामचंद्र बहिरवाड, प्रशांत बहिरवाड, विशाल बहिरवाड आणि शक्ती यांनी त्यांना मारहाण केली. या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

अकरा वर्षीय मुलाला पळविले

शहरातील रावत कॉलनी भागातून एका अकरा वर्षीय मुलाला फूस लावून पळविण्यात आले. ही घटना २२ ऑगस्ट रोजी घडली. आकाश अनिल भवरे हा मुलगा दुकानावर किराणा साहित्य आणण्यासाठी गेला होता. या वेळी अज्ञात आरोपीने त्याला पळवून नेले. या प्रकरणात जयमाला भवरे यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

नोकरीसाठी विवाहितेकडे दोन लाखांची मागणी

नोकरीसाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेला उपाशीपोटी ठेवून मारहाण करण्यात आली. या प्रकरणात पीडितेने महिला साहाय्य कक्षात तक्रार दिली होती. त्यानंतर निखिलकुमार नागसेन ढगे, नागसेन ढगे, अनिता ढगे, हर्षल ढगे, नीलम ढगे यांच्या विरोधात भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

Web Title: Two-wheeler lampas from Mahavir Chowk area