शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

क्रुझर गोदावरीत कोसळून दोघांचा मृत्यू; जेऊन परतीचा प्रवास सुरु असताना झाला अपघात

By श्रीनिवास भोसले | Updated: May 10, 2024 21:39 IST

थोराजी ऊर्फ बबलू मारूती ढगे (२५) आणि चालक उद्धव आनंदराव खानसोळे (३०) या दोघांचा झाला मृत्यू

श्रीनिवास भोसले, नांदेड: जेवण करून परत येत असताना गोदावरीत क्रुझर कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी मुदखेड तालुक्यातील येळी महाठी पुलावर घडली. मयतांमध्ये थोराजी ऊर्फ बबलू मारूती ढगे (वय २५, रा. येळी) आणि चालक उद्धव आनंदराव खानसोळे (वय ३०, रा. शिखाची वाडी) या दोघांचा समावेश आहे. शिखाचीवाडी येथील चालक उद्धव खानसोळे हे चिलपिंपरी येथे क्रुझर (क्र.एम.एच-२६ बी.क्यू.२०६१) गाडीचे भाडे करून आपल्या मित्राला येळी येथे सोडण्यासाठी जात होते. दरम्यान, येळी महाठी येथील गोदावरीनदीच्या पुलावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ही गाडी पुलावरून २५ ते ३० फूट खोल गोदावरी नदीच्या पात्रात कोसळली.

घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. मुदखेड पोलिसांसह नांदेड येथील अग्निशमन दलाच्या जवानांनाही पाचारण करण्यात आले. परंतु, नदीपात्रात पाणी असल्याने क्रुझर पाण्यात बुडून चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला. पाण्यात बुडालेली क्रुझर परिसरातील नागरिकांनी दोरीच्या सहाय्याने नदीपात्राबाहेर खेचून काढली. या गाडीत असलेल्या दोघांचाही मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. घटनास्थळी मुदखेड ठाण्याचे पोलिस निरीक्षक सप्रे आणि त्यांची टीम तसेच नांदेड येथील अग्नीशमन दलाचे केरोजी दासरे, दिनेश कांबळे, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, उमेश ताटे, संग्राम गीते, जीवरक्षक हबीब व इतर जवान पोहोचले होते.

टॅग्स :AccidentअपघातgodavariगोदावरीriverनदीDeathमृत्यू