विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात लातूर, हिंगोली येथील वसतिगृहासाठी प्रत्येकी दोन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 03:14 PM2021-03-15T15:14:29+5:302021-03-15T15:17:14+5:30

या अर्थसंकल्पात विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विकासाबरोबरच विद्यापीठ उपकेंद्रासाठी विकासात्मक तरतूद करण्यात आली.

Two crore each for hostel at Latur, Hingoli by SRT Universities budget | विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात लातूर, हिंगोली येथील वसतिगृहासाठी प्रत्येकी दोन कोटी

विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात लातूर, हिंगोली येथील वसतिगृहासाठी प्रत्येकी दोन कोटी

Next
ठळक मुद्देस्वारातिमच्या अर्थसंकल्पास अधिसभेची मंजुरी

नांदेड : कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन अधिसभेची बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्‍वर हसबे यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील विकासाबरोबरच विद्यापीठ उपकेंद्रासाठी विकासात्मक तरतूद करण्यात आली.

यामध्ये मॉडल डिग्री कॉलेज हिंगोलीसाठी महाराष्ट्र शासन अनुदान अंतर्गत मुला-मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी २०० लक्ष तरतूद करण्यात आली आहे. तर सोलार सिस्टिम करिता ३० लक्ष तरतूद करण्यात आली. कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट अंतर्गत आवर्ती खर्चासाठी ३४ लक्ष व अनावर्ती खर्चासाठी १४ लक्ष तरतूद करण्यात आली आहे. लातूर येथील उपकेंद्रांमध्ये मुला-मुलींच्या वसतिगृह बांधकामासाठी २०० लक्ष तरतूद करण्यात आली. परभणी येथील इमारत बांधकामासाठी १५० लक्ष तरतूद करण्यात आली. 

विद्यापीठाने लाईफ लाँग लर्निंग ची स्थापना करण्यासाठी महाविद्यालयांसाठी यंदा तरतूद केली आहे. यामध्ये संशोधन प्रोत्साहन योजनाकरिता १५ लक्ष, महाविद्यालयातील आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रे परिषदा सेमिनार इत्यादी योजना करिता २० लक्ष तरतूद करण्यात आली आहे. महाविद्यालयीन संशोधक प्रकल्पासाठी ५० लक्ष, तर विद्यापीठ संकुलातील शिक्षक संशोधकांसाठी २० लक्ष तरतूद करण्यात आली. संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, परिषदांना उपस्थित राहण्यासाठी १५ लक्ष आणि विद्यापीठ संकुलातील संशोधकांसाठी १५ लक्ष तरतूद केली आहे. भाषा दिन करिता ७ लाख तर मराठी भाषा संवर्धन पंधरवडा करिता ५ लक्ष रुपये तरतूद करण्यात आली. सदर अर्थसंकल्प अधिसभेच्या ऑनलाईन बैठकीमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

Web Title: Two crore each for hostel at Latur, Hingoli by SRT Universities budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.