तामसा-नांदेड रोडवर दोन कारची समोरासमोर धडक; १० जण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2023 15:01 IST2023-04-18T15:01:08+5:302023-04-18T15:01:56+5:30

तामसा ते नांदेड रोडवर पिंपराळा पाटीजवळ झाला अपघात

Two cars collide head-on at Pinparala ; 10 people seriously injured | तामसा-नांदेड रोडवर दोन कारची समोरासमोर धडक; १० जण गंभीर जखमी

तामसा-नांदेड रोडवर दोन कारची समोरासमोर धडक; १० जण गंभीर जखमी

- संदीप तुपकरी 
हदगाव ( नांदेड) :
तालुक्यातील तामसा ते नांदेड रोडवर पिंपराळा पाटीजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही वाहनातील मिळून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला. 

हदगाव तालुक्यातील कांडली खुर्द येथील सचिन साहेबराव कारले (३१) नांदेडकडे आपल्या कारने जात होते. तामसा ते नांदेड रोडवर पिंपराळा पाटीजवळ कारले यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारसोबत (एम एच.२९.बि.पी ०५२९ ) समोरासमोर धडक झाली. यात सचिन कारले आणि सामोरी गाडीतील ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तामसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी सर्वांना नांदेड येथे हलवण्यात आले आहे. 

जखमींची नावे अशी: 
विशाल भिमा बिमलवाड २२, कांता दत्ता बिमलवाड ५०, आशुतोष निलोडवाड१५, पदमीन राम बिम्मलवाड ५५, आकांक्षा बिम्मलवाड १६, वर्षा बाळु बिम्मलवाड ९२, दत्ता बिम्मलवाड ५०, शांताबाई सोनुले ५८, चंद्रकलाबाई निलोडवाड ६०, सचिन साहेबराव कारले ३१, सर्व राहणार कांडली खुर्द

Web Title: Two cars collide head-on at Pinparala ; 10 people seriously injured