फायनान्स कंपनीचे सव्वादोन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:20 IST2021-01-19T04:20:37+5:302021-01-19T04:20:37+5:30

गोकुंदा येथे भारत फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे.१७ जानेवारीच्या रात्री पंकज उद्धवराव गरड हे आणि अन्य एकजण शाखेमध्ये झोपले होते. ...

Twelve lakh lampas of finance company | फायनान्स कंपनीचे सव्वादोन लाख लंपास

फायनान्स कंपनीचे सव्वादोन लाख लंपास

गोकुंदा येथे भारत फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे.१७ जानेवारीच्या रात्री पंकज उद्धवराव गरड हे आणि अन्य एकजण शाखेमध्ये झोपले होते. अज्ञात चोरट्याने शाखेमध्ये प्रवेश करुन तिजोरीचा कडीकोंडा तोडून आतील २ लाख ३१ हजार रुपये लंपास केले. सकाळी ही बाब उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास सपोनि भोळ हे करीत आहेत. तर दुस-या घटनेत मुदखेड तालुक्यातील धनगर गल्ली येथे चोरट्यांनी घर फोडून ६५ हजारांचा ऐवज लंपास केला. गलू कोमराजी बिसमिल्ले हे आजारी पत्नीस भेटण्यासाठी नांदेडला आले होते. ही संधी साधून चोरट्यांनी घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ६५हजारांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणात मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोहे कॉ.गिते हे करीत आहेत.

Web Title: Twelve lakh lampas of finance company