तूर, सोयाबीनची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:31 IST2021-02-06T04:31:02+5:302021-02-06T04:31:02+5:30
आडे यांचा सत्कार धर्माबाद - काँग्रेसच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत पहिले बक्षीस साईनाथ आडे यांना मिळाले. त्याबद्दल पालकमंत्री अशोकराव ...

तूर, सोयाबीनची चोरी
आडे यांचा सत्कार
धर्माबाद - काँग्रेसच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत पहिले बक्षीस साईनाथ आडे यांना मिळाले. त्याबद्दल पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला आ. अमर राजूरकर, माजी आ. वसंत चव्हाण, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दत्ताहरी पाटील आदी उपस्थित होते.
अर्जापुरात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम
बिलोली - तालुक्यातील अर्जापूर ग्रामपंचायत कार्यालयात महालक्ष्मी स्वयंसहायता बचत गटाकडून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात कमल पय्यावार, लक्ष्मीबाई यन्नावार, सावित्राबाई बोधनकर, लक्ष्मीबाई ठाकूर यांच्या हस्ते लक्ष्मीदेवीचे पूजन करण्यात आले. यावेळी उज्ज्वला पतंगे, मीरा कमनवार, गंगाबाई पोरडवार, अनिता सोबेकर, लक्ष्मीबाई मेंढकर, शोभा पोरडवार यांची उपस्थिती होती.
कापसीत निधी संकलन
लोहा - तालुक्यातील कापसी येथे रामभक्तांकडून अयोद्धेतील राम मंदिरासाठी निधी संकलन करण्यात आला. यात २८ हजार ८६१ रुपयांचा निधी जमा झाला. यावेळी मधुसूदन गिरी महाराज, बापूजीमाली पाटील, महेश वडवळे, गणेश पालदेवार, बालाजी उचले, मदनसिंग ठाकूर, मोनिका शिंदे, राजू जिगळे, बाबू वडवळे, गोविंद संगनवार आदी उपस्थित होते.
निबंध स्पर्धेचे बक्षीस
उमरी - पालिकेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत परमेश्वर माने याने प्रथम क्रमांक मिळविला. अनुश्री मदनवाड ही द्वितीय तर रियाज शेख याने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना मुख्याधिकारी शंकर नरावाड यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाला कार्यालयीन अधीक्षक हमीद अंसारी, उपनगराध्यक्ष महंमद रफीक व अन्य उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट
मुदखेड - शहरात विविध ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. दोन दिवसांपूर्वी अशाच कुत्र्यांनी चावा घेतल्याने सहा जणांना रुग्णालयात हलविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.कपिल जाधव यांनी मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना याबाबतचे पत्र दिले. पालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
शॉर्टसर्किटने ऊस जळाला
नायगाव - तालुक्यातील अंतरगाव येथील मीराबाई शिंदे यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला. यात त्यांचे मोठे नुकसान झाले. लोंबलेल्या विद्युत तारामुळे शॉर्टसर्किट होऊन उसाला आग लागली, अशी तक्रार शिंदे यांनी केली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
खरेदी केंद्राचा शुभारंभ
हदगाव - नाफेच्या तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ हदगावमध्ये करण्यात आला. यावेळी सहायक निबंधक मगर, संस्थेचे चेअरमन बळीराम देवकते, व्हाइस चेअरमन विनायकराव कदम, संचालक धनंजय शिंदे, प्रभाकर पत्तेवार, सुभाष राठोड, शेषराव सूर्यवंशी, बाळासाहेब शिंदे, डॉ. सुरेशराव जाधव, रत्नाकर जांबुतकर, संजय कवडे आदी उपस्थित होते.
भोसीकर यांची निवड
कंधार - राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाली. पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.